मुंबई | दापोली रिसॉर्ट संदर्भातील कथित जमीन व्यवहार घोटाळ्याप्रकरणी अनिल परब यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
दापोली रिसाॅर्ट प्रकरणी अनिल परब यांच्यावर कारवाई सुरु आहे. अनिल परब यांना दापोलीमधील जमीन विकणाऱ्या विभास साठेंच्या कोथरुडमधील घरावरही छापा टाकण्यात आला होता.
भाजप नेते किरीट समोय्या यांनी याप्रकरणी वक्तव्य केलं आहे. या प्रकरणातील व्यावसायिक विभास साठे यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी सोमय्या यांनी केली आहे.
विभास साठे यांच्या जीविताला धोका असल्याचे सांगत सोमय्यांनी महाराष्ट्र पोलीस महासंचालकांना पत्र लिहीले आहे.
“विभास साठे यांचे “मनसुख हिरेण” होऊ नये”, असंही किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता पुन्हा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
साठे यांच्याकडून 1 कोटी 10 लाखाला रिसॉर्टसाठी जमीन खरेदी केल्याचा आरोप सोमय्या यांनी परब यांच्यावर केला.
महत्त्वाच्या बातम्या –
मुख्यमंत्र्यांवर टीका करताना नितेश राणेंची जीभ घसरली, म्हणाले…
आर्यन खान प्रकरणानंतर समीर वानखेडेंना मोठा धक्का, महाराष्ट्राबाहेर बदली
Petrol Diesel संदर्भात महत्त्वाची बातमी, पेट्रोल पंप चालकांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी
मोठी बातमी ! नारायण राणेंच्या अडचणींत पुन्हा वाढ, समोर आली ‘ही’ माहिती