मुंबई | राज्यात सध्या विविध मुद्द्यांवरुन वातावरण तापलेलं आहे. अशातचअधिश बंगल्यावरुन नारायण राणें अडचणींत सापडलेले आहेत. अशातच आता राणेंच्या अडचणींत वाढ झाली आहे.
मुंबई महापालिकेनंतर आता मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी अधिश बंगल्याविषयी नारायण राणेंना नोटीस बजावली आहे.
राणेंना बजावलेल्या या नोटीसवरुन आता भाजप नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्र्यावर टीकास्त्र सोडताना नितेश राणेंची जीभ घसरल्याचं पहायला मिळालं. महाराष्ट्राला पनवती लागून आज अडीच वर्षे झालीयेत. *** मुख्यमंत्री राज्याला मिळालेला आहे.
उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कुठलाही नियम नसताना कारवाई करतात. आताच घरी एक नोटीस दिलीये. काही लोक क्षणात निर्णय घेतात. वडिलांच्या आशीर्वादाने मिळालेल्या पदाचा मान सन्मान ठेवत नाहीत.
शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या लोकांना कुठलं इंजेक्शन द्यायचं आणि झोपवायचं, हे आम्हाला माहित आहे, असंही राणे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या –
आर्यन खान प्रकरणानंतर समीर वानखेडेंना मोठा धक्का, महाराष्ट्राबाहेर बदली
Petrol Diesel संदर्भात महत्त्वाची बातमी, पेट्रोल पंप चालकांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी
मोठी बातमी ! नारायण राणेंच्या अडचणींत पुन्हा वाढ, समोर आली ‘ही’ माहिती
“आयुष्यात कधी कुठल्या राजकीय व्यासपीठावर दिसणार नाही”