श्वानाने केलं मंदीर मंत्रमुग्ध; गायले परफेक्ट सुरात अभंग

मुंबई | एका श्वानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चक्क  श्वान रात्रीच्यावेळी ग्रामस्थांना मंदिरात भजनाला साथ देताना दिसत आहे.

मंदिरात रात्रीच्यावेळी ग्रामस्थांचं भजन सुरू होतं. त्याच वेळी तिथे असलेल्या पांढऱ्या रंगाच्या श्वानानं ग्रामस्थांच्या सुरात सूर मिसळण्याचा प्रयत्न केला. त्यानेही भजनाला उत्तम साथ देण्याचा प्रयत्न केल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

मंदिरात सुरू असलेल्या भजनात पांढऱ्या रंगाचा कुत्रा कसा साथ देताना दिसत आहे . सुरुवातील ग्रामस्थांनाही या गोष्टीचं फार अप्रूप वाटलं.

पेटी वाजवत असणाऱ्या कांकांच्या बाजूला उभं राहुन हा कुत्रा आपला सूर त्यांच्यासोबत मिळवू पाहात आहे. असं या व्हिडिओतून आपल्याला दिसतंय.

 

महत्वाच्या बातम्या- 

-आशिषजी बाप बाप असतो; सचिन आहेर शेलारांवर भडकले

-मुंबईतील वर्सोवा भागात मनसे कार्यकर्त्यांनी बांगलादेशी घुसखोरांना दिला इशारा

-सहकारमंत्र्यांच्या रॅलीत सोनं आणि पाकीट चोरी करणाऱ्या टोळीला कराडमध्ये अटक

-राजधानी काबीज करण्यासाठी भाजपची टीम दिल्लीदरबारी

-“… तर मुंबईत फिरणं अशक्य होईल”