शॅाकिंग… राजीनामा विराट कोहलीचा; हादरा बसला रोहित शर्माला!

नवी दिल्ली | विराट कोहली भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार झाला आहे. दक्षिण आफ्रिकाविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर विराटने कसोटी संघाचं कर्णधारपद सोडत असल्याचा निर्णय जाहीर केला.

विराटने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली. विराटने कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर भारतीय संघाचा टी-20 आणि वनडेचा कर्णधार रोहित शर्माने यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

धक्कादायक!! पण भारतीय कर्णधार म्हणून यशस्वी कारकिर्दीबद्दल अभिनंदन. भविष्यासाठी शुभेच्छा, असं रोहितने कोहलीसोबतचा एक फोटो टाकून त्याला कॅप्शन दिलं आहे.

मागील वर्षी झालेल्या टी-20 वर्ल्डकपनंतर विराट टी-20 संघाचे कप्तानपद सोडले. त्यानंतर बीसीसीआयने विराटला वनडेच्या कर्णधारपदावरूनही हटवलं आहे. रोहित शर्माला टी-20 आणि वनडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे.

बीसीसीआयने (Bcci) त्याच्याकडील एकदिवसीय क्रिकेटचेही कर्णधारपद काढून घेतलं, त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याआधी यावरून मोठा हायव्होल्टेज ड्रामा झाल्याचंही दिसून आलं. महेंद्रसिंह धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर गेल्या सात वर्षापासून विराट कोहली कर्णधार होता.

मी बीसीसीआयचे आभारा मनातो, की त्यांनी मना संधी दिली. देशाच्या संघाचं नेतृत्त्व करण्याची संधी मला मिळाली, हे मी माझं भाग्य समजतो. या संपूर्ण प्रवासात कधीच कोणत्याही परिस्थितीच हार न मानण्याची शिकवण देणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांचेही मी आभार मानतो, असं विराट म्हणाला.

रवीभाई आणि मला नेहमी प्रोत्साहित करणाऱ्या पडद्यामागील महत्त्वाच्या सर्वजणांचं योगदानही मोठं आहे. तुम्ही जगण्याला दृष्टी देण्याचं मोलाचं काम केलं आहे. आणि सर्वात शेवटी मी एमएस धोनीचे शतशः आभार मानतो. त्याच्यामुळे मी कर्णधार बनू शकलो. धोनीला माझ्यात नेतृत्त्व दिसल्यामुळे, त्यानं भारतीय संघाला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी माझं सुचवलं. त्याचे मनापासून आभार, असं ट्विट त्याने केलं आहे.

संघाला एका योग्य दिशेनं घेऊन जाण्यासाठी मी सलग सात वर्ष अखंड मेहनत घेतली. त्यासाठी अविरतपणे झटलो. मी माझी जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. प्रत्येक गोष्टीला कुठे ना कुठे अंत असतो. भारतीय कसोटी संघाचा कर्णधार या नात्याला पूर्णविराम लावायची वेळ आता आली आहे. या प्रवासात मी अनेक चढउतार पाहिले, अनुभवले. पण कधीच कुठे कशाची कमी भासणार नाही, यासाठी मनापासून पूर्ण प्रयत्न केले, असं विराट कोहलीने म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

शेतात रहायला गेलेल्या सलमानचं शेजाऱ्यासोबत भांडण, या कारणामुळे खटला दाखल 

‘धोका अजून टळलेला नाही, Omicron नंतर…’; तज्ज्ञांनी दिला ‘हा’ गंभीर इशारा 

“विराट मान उंच ठेव… तू कर्णधार म्हणून जे मिळवलं, ते फार कमी जणांना जमलंय” 

‘तमाशा बनवलाय माझा’, ऐनवेळी तिकीट नाकारल्याने ढसा ढसा रडला ‘हा’ नेता, पाहा व्हिडीओ 

नोकरीची सुवर्णसंधी; दहावी, बारावी पास असणाऱ्यांसाठी मोठी बातमी