सुपर ओव्हरमध्ये मी बँटींग करायला जाणार नव्हतो पण….. ; विराट कोहलीने सांगितला किस्सा

मुंबई |  भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या चौथ्या टी ट्वेन्टी सामन्यात पुन्हा एकदा सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळाला. या सामन्यात देखील भारताने न्यूझीलंडचा पराभव केला. पण सुपर ओव्हरमध्ये फटकेबाजी करणाऱ्या विराट कोहलीने मी फलंदाजीसाठी जाणार नव्हतो. कारण चांगली फटकेबाजी करणारे दोन खेळाडू संघात आहेत, असा विचार मी केला होता, असं विराटने सांगितलं.

सुपर ओव्हरमध्ये के. एल. राहुल आणि संजू सॅमसन ओपनिंगला खेळायला जाणार होते. कारण राहुल आणि संजू मोठे फटके मारतात. पण अनुभव असल्यामुळे मी मैदानात बँटींगसाठी गेलो. दबावामध्ये इनिंग सांभाळणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं आणि बँटींग करताना हाच विचार माझ्या मनात होता, असं विराट म्हणाला.

सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडला पराभव करण्याची भारताची ही दुसरी वेळ आहे. आजच्या सामन्यात न्यूझीलंडला शेवटच्या षटकामध्ये 7 धावांची गरज असताना शार्दुल ठाकूरने शेवटचे दोन चेंडू स्लो टाकत सामना सुपर ओव्हरपर्यंत घेऊन गेला. भारतानं दिलेल्या 166 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडला हे आव्हान पार करता आले नाही. अखेर सुपर ओव्हरमध्येही पुन्हा एकदा टीम इंडियाचा डंका पाहायला मिळाला.

दरम्यान, भारताने सलग चौथा सामना जिंकत सामन्यांच्या मालिकेत 4-0 अशी आघाडी घेतली आहे. शेवटच्या सामन्यात काय होणार याकडे सगळ्या क्रिकेट रसिकांचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-