रायपूर | तुम्हाला नेता व्हायचं असेल तर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांची कॉलर पकडायला शिका, असा सल्ला छत्तीसगडचे मंत्री कवासी लखमा यांनी विद्यार्थ्यांना दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
कवासी लखमा यांचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मोठा नेता व्हायचं असेल तर कलेक्टर आणि एसपी यांची कॉलर पकडायला शिका. त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
पाचवेळा काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आलेले कवासी लखमा यापूर्वीही अशाच वादात सापडले होते. लोकसभा निवडणुकीच्यावेळी कणकेर जिल्ह्यातील मतदारांना काँग्रेसविरोधात मतदान केल्यास वीजेचा शॉक देण्याची धमकी दिली होती.
2013 मध्ये नक्षलवादी हल्ल्यात छत्तीसगड काँग्रेसमधील अनेक नेते मारले गेले होते. मात्र कवासी लखमा या हल्ल्यातून बचावले होते. त्यामुळे या हल्ल्यात त्यांचा सहभाग असल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला होता.
दरम्यान, लखमा यांनी याप्रकरणी सारवासारव करताना माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचं सांगितलं आहे.
“संभाजी भिडेंची ISROच्या प्रमुख पदी नियुक्ती करा”- https://t.co/FsBAmATdgH #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 10, 2019
महाराष्ट्राला वाचवण्यासाठी राष्ट्रवादीला सत्ता द्या- सुप्रिया सुळे- https://t.co/OANfLlrnQj #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 10, 2019
…तर माझं नाव बदला; खासदार अमोल कोल्हेंचं खुलं आवाहन- https://t.co/4Sf3oHGAIJ #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 10, 2019