राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान खात्याचा अंदाज

मुंबई | तापमानाचा पारा हा सातत्याने वाढताना दिसत असून एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच अनेक भागांत तापामानाने उच्चांक गाठला . वाढत्या तापमानामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.

पुढील तीन दिवस राज्यातील विविध भागांत मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

हवामान विभागाने पुढील चार दिवस अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. इतकेच नाही तर राज्यातील 10 जिल्ह्यांना हवामान खात्याने यल्लो अलर्ट दिला आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बुलढाणा, अकोला, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांत पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला असून यल्लो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात  हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“पोलिसांनी राज ठाकरे यांना बेड्या ठोकाव्यात” 

अत्यंत धक्कादायक घटना; पत्नीच्या हट्टासाठी आईला नदीत फेकलं 

“कोरोना काळात पुण्याला कोण पळून गेलं हे सगळ्यांना माहिती” 

Corona: महाराष्ट्र कोरोनामुक्त होतोय! वाचा राज्याची आजची ताजी आकडेवारी

Amit Shah: “…तेव्हा मला राग येतो”, गृहमंत्री अमित शहांचा संसदेत खुलासा