मुंबई | शिवसेनेत बंड झाल्याने शिवसेना पक्षाला मोठा धक्का बसला. शिवसेना पक्षप्रमुखांना राजीनामा द्यावा लागला आणि महाविकास आघाडी सरकार (MVA) पडले. त्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.
शिवसेना पक्ष सोडण्याची अनेक कारणे एकनाथ शिंदे गटाने सांगितली. त्यातील एक म्हणजे, शिवसेनेने हिंदुत्व सोडले आणि त्यांनी शिवसेनेचे हाडवैरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांसोबत युती केली.
शिवसेनेने आपल्या आमदारांची मनधरणी करण्याचे देखील भरपूर प्रयत्न केले. ते सर्व निष्फळ निघाले. त्यानंतर शिवसेनेने पक्ष फुटल्याचे स्वीकारले आणि पक्षाच्या पुर्नबांधणीसाठी रस्त्यावर उतरले.
आता भाजपचे नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danave) यांनी शिवसेेनेच्या या स्थितीवर भाष्य केले आहे. उद्धव ठाकरे यांनी आता आमच्यासोबत यावे किंवा नाही, यासाठी आम्ही त्यांच्या दारात जाणार नाही, असे दानवे म्हणाले.
ज्या युतीला राज्यातील लोकांनी मत दिले, पसंती दिली, त्याच जनतेचा विश्वासघात करत त्यानी काँग्रेस (INC) आणि राष्ट्रवादीसोबत (NCP) संधान बाधले आणि स्वत: मुख्यमंत्री बनले, असे दानवे म्हणाले.
कोणाला यायचे असले, किंवा कोणी येणार असेल, किंवा कोणाला मागच्या घटनेचा पश्चात्ताप झाला असेल, तर त्यांनी यायला हरकत नाही, त्यांनी आमच्यासोबत यावे आणि युतीत रहावे, असे देखील दानवे पत्रकारांसोबत बोलताना म्हणाले.
राजकारणात कुणी कोणाचा कायमचा मित्र नसतो आणि शत्रूही नसतो. उद्धव ठाकरे बराच काळ आमच्यासोबत होते. 25 वर्षे आम्ही एकत्र होतो. परंतु त्यांना अचानक आमच्यासोबत राहिल्याने त्यांचे नुकसान झाल्याचे वाटले आणि त्यांनी युती तोडली, असे पुढे बोलताना दानवे म्हणाले.
आता आम्ही नवीन मित्र जोडले आहेत. एकनाथ शिंदे आता आमच्यासोबत आहे. त्यामुळे मूळ शिवसेना आमच्यासोबत असून राज्यात भाजप शिवसेनेचे सरकार आहे, असे दानवे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
“प्रत्येक मराठी माणसाचा स्वाभिमान दुखावणारा फोटो, शिंदे साहेब वाईट वाटलं”
टीईटी घोटाळ्याचे धागेदोरे अब्दुल सत्तारांपर्यंत, अत्यंत महत्त्वाची माहिती समोर
बिहारमध्ये राजकीय भूकंप होणार?, नितीश कुमार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
‘ईडीविरोधात काँग्रेस रस्त्यावर, तुम्ही…’; शिवसेनेचा सामनाच्या अग्रलेखातून राष्ट्रवादीला प्रश्न
“चंद्रकांत खैरे यांच्या डोक्यावर परिणाम झालाय”