हे खेळाडू क्रिकेटचं मैदान गाजवून राजकीय मैदान गाजवण्यास सज्ज! पाहा कोणकोणत्या खेळाडूंची राजकारणात एंट्री

Indian Cricketer’s Entry Into Politics l सध्या सर्वत्र राजकारणाचे वारे फिरत आहेत. सर्वच क्षेत्रातील नामांकित व्यक्ती राजकारणात प्रवेश करताना दिसत आहेत. अशातच भारतीय क्रिकेटर देखील राजकारणात आपला ठसा उमटवत आहेत. काल तृणमूल काँग्रेस (TMC) च्या 42 उमेदवारांची यादी पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणूक 2024 साठी जाहीर करण्यात आली.

यामध्ये स्टार उमेदवारांसह, टीएमसीच्या यादीत नवीन चेहऱ्यांची नावे देखील होती, ज्यामध्ये माजी क्रिकेटर युसूफ पठाणचे (Yusuf pathan) नाव आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने युसूफ पठाण यांना बहरामपूरमधून उमेदवारी दिली आहे. कदाचित या यादीतील ते एकमेव उमेदवार असतील जे राजकारणात नवीन आहेत आणि मूळचे पश्चिम बंगालच्या बाहेरचे आहेत.

Indian Cricketer’s Entry Into Politics l राजकारणाच्या मैदानात युसूफ पठाणची एंट्री :

काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बहरामपूरमधून युसूफ पठाणला रिंगणात उतरवण्यात आले आहे. गुजरातमधील बडोदा येथे जन्मलेला आणि क्रिकेटच्या मैदानावरील आक्रमक अष्टपैलू युसूफ पठाणने जवळपास 2 दशकांच्या कारकिर्दीनंतर फेब्रुवारी 2021 मध्ये क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून अधिकृतपणे निवृत्ती घेतली. 2011 च्या क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघाचाही तो भाग होता. सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे राजकीय क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर युसूफ पठाणचा सामना त्याच्या दोन माजी सहकाऱ्यांशी होणार आहे.

युसूफ पठाणचा एक माजी सहकारी लोकसभेत तर दुसरा राज्यसभेत खासदार :

युसूफ पठाणच्या आधी टीम इंडियाचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंग 2022 मध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टी (AAP) मध्ये सामील झाला होता. सध्या तो राज्यसभेत पक्षाचे खासदार आहे.

संसदेच्या वरिष्ठ सभागृहात, तर भज्जीच्या आधी, टीम इंडियाचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर मार्च 2019 मध्ये भाजपमध्ये सामील झाला होता. सध्या ते लोकसभेतून पक्षाचे खासदार आहेत. गौतम गंभीर, हरभजन सिंग आणि युसूफ पठाण हेच तीन खेळाडू 2011 क्रिकेट विश्वचषकात एकाच संघाचे भाग होते. मात्र आता ते सर्व वेगवेगळ्या राजकीय पक्षात आहेत.

Indian Cricketer’s Entry Into Politics l तब्बल एवढे खेळाडू राजकारणात! :

2011 क्रिकेट विश्वचषक संघाव्यतिरिक्त आतापर्यंत अनेक खेळाडू राजकारणाकडे वळले आहेत. यामध्ये कीर्ती आझाद (टीएमसी), मोहम्मद अझरुद्दीन (काँग्रेस), नवज्योत सिंग सिद्धू (काँग्रेस), मनोज तिवारी (टीएमसी), चेतन चौहान (भाजप), श्रीशांत (भाजप), अशोक देआंदा (भाजप), मोहम्मद कैफ (काँग्रेस), मन्सूर अली खान ‘टायगर’ पतौडी (विशाल हरियाणा पार्टी) आणि विनोद कांबळी (लोक भारती पार्टी) हे खेळाडू आत्ता राजकारणात सक्रिय आहेत.

News Title : Indian Cricketer’s Entry Into Politics

महत्त्वाच्या बातम्या-

ऑस्कर 2024 विजेत्यांची संपूर्ण यादी! या चित्रपटाने जिंकले सर्वाधिक पुरस्कार

अजित पवार गटाला मोठा धक्का! हा बडा नेता पुन्हा शरद पवारांकडे परतला

आजचे राशिभविष्य! या राशीच्या व्यक्तींना पोटाचे विकार जाणवू शकतात

रात्री घुबड दिसणे शुभ की अशुभ, जाणून घ्या यामागचे सत्य

केंद्र सरकारने कांद्या संदर्भात घेतला मोठा निर्णय! आखला जबरदस्त प्लॅन