… तर रोहित शर्मा होऊ शकतो चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार!

IPL 2024 l यंदाच्या वर्षी इंडियन प्रीमियर लीगच्या 17 व्या हंगामाला 22 मार्चपासून सुरवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील स्पर्धेतील सलामीचा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांकडून खेळलेला अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज अंबाती रायडूने आगामी स्पर्धेसाठी एक मत व्यक्त केले आहे. रायडूने CSK संघासोबत 2023 चे विजेतेपद जिंकल्यानंतर आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे. अशातच आता रायडूने मुंबई इंडियन्सच्या कर्णधार बदलाबाबत मत व्यक्त केलेआहे.

IPL 2024 l हार्दिक पांड्याला अडचणीचा सामना करावा लागणार :

आयपीएल 2024 चे अनुभवी आयपीएल फलंदाज अंबाती रायडूने इच्छा व्यक्त केली की जेव्हा एमएस धोनी निवृत्त होईल तेव्हा त्याच्या जागी रोहित शर्मा चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करू शकेल. आयपीएल 2024 चा सलामीचा सामना गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. मुंबई इंडियन्सचा पहिला सामना गुजरात टायटन्सविरुद्ध होणार आहे.

मुंबई इंडियन्सने आगामी स्पर्धेसाठी रोहित शर्माच्या (Rohit Sharma) जागी हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) कर्णधारपद सोपवले आहे. गुजरात टायटन्स आणि पलटनचे वातावरण वेगळे असल्याने हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सांभाळणे कठीण जाईल असे रायडूचे मत आहे. हार्दिक पांड्याने मुंबईसाठी एक वर्ष खेळून नंतर कर्णधारपद स्वीकारायला हवे होते, असे रायुडूचे मत आहे. कारण रोहित अजूनही भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे.

IPL 2024 l आयपीएलमध्ये रोहितची कामगिरी कशी? :

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत रोहित शर्मा चौथ्या स्थानावर आहे. उजव्या हाताच्या फलंदाजाने 243 सामन्यात 6211 धावा केल्या आहेत. मुंबई इंडियन्स 24 मार्च रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध आयपीएल 2024 मध्ये त्यांच्या मोहिमेची सुरुवात करणार आहे.

News Title : Ms Dhoni Retires Then Rohit Sharma CSK Captin

महत्त्वाच्या बातम्या-

होळीला घरी जायचंय? तर अशाप्रकारे रेल्वेचे तिकीट बुक करा

या व्यक्तीने खरेदी केली भारतातील पहिली Aston Martin DB12 कार, किंमत आहे कोटींमध्ये

हे खेळाडू क्रिकेटचं मैदान गाजवून राजकीय मैदान गाजवण्यास सज्ज! पाहा कोणकोणत्या खेळाडूंची राजकारणात एंट्री

ऑस्कर 2024 विजेत्यांची संपूर्ण यादी! या चित्रपटाने जिंकले सर्वाधिक पुरस्कार

अजित पवार गटाला मोठा धक्का! हा बडा नेता पुन्हा शरद पवारांकडे परतला