मुंबई | बॉलिवूड चित्रपटसृष्टीत अनेक प्रसिद्ध कलाकार आहे, ज्यांची मुलेही या क्षेत्राकडे वळाली आहेत म्हणजेच चित्रपटसृष्टीत काम करतात. यात सर्वात आघाडीवर बच्चन कुटुंबाचे नाव येते. बच्चन कुटुंबामध्ये अमिताभ बच्चन, जया बच्चन, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन हे सर्व चित्रपटसृष्टीत काम करत आहे.
बच्चन कुटुंबातील प्रत्येकाने आपली ओळख स्वतः निर्माण केली आहे. त्यातल्या त्यात अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे. अमिताभ बच्चन रोज सकाळी त्यांच्या वडिलांनी लिहिलेली काव्यपंक्ती टाकतात. तसेच अमिताभ बच्चन विविध मुद्द्यांवर आपले मत मांडत असतात.
सोशल मीडियावर अभिषेक बच्चन यांच्यावर कोण ना कोणतरी नेहमी निशाणा साधत असतात. कधी एखाद्या चित्रपटामुळे, कधी चित्रपटातील अभिनयामुळे तर कधी एखाद्या मिम्समुळे. अशा विविध कारणांवरून युजर अभिषेक बच्चन यांना ट्रो.ल करत असतात.
अभिषेक बच्चन जेव्हा ट्रो.ल होतात, तेव्हा ते कोण काय बोलतंय यावर विशेष नजर ठेवून असतात. त्यात अभिषेक बच्चन यावर उत्तर द्यायला कधीही घाबरत नाही, ते अगदी सडेतोड उत्तर देतात. यावेळी अभिषेक बच्चन यांना एका युजरने बॉलिवूडमध्ये सध्या चालू असलेल्या घडामोडींसंदर्भात एक प्रश्न विचारला.
सध्या बॉलिवूडमध्ये ड्र.ग्ज कनेक्शनबाबत चर्चा चालली आहे. यात अनेक दिग्गज बॉलिवूड कलाकारांची नावे समोर आली आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने व्हाट्सअप चॅटमध्ये विचारले होते की, “मा.ल आहे का ?” याला धरूनच एका युजरने अभिषेक बच्चन यांना प्रश्न विचारला की, “हॅश आहे का?”
अभिषेक बच्चन यांनी या युजरला खूपच मजेशीर उत्तर दिले. अभिषेक बच्चन म्हणाले,”नाही, माफ करा. असं करू नका. पण मला तुमची मदत करायला आणि तुम्हाला मुंबई पोलिसांसमोर घेऊन जायला खूपच आनंद होईल. मला विश्वास आहे की, मुंबई पोलिसांना तुम्ही मदत केली तर त्यांना आनंद होईल.”
पुढे बोलताना अभिषेक बच्चन म्हणाले, “यामध्ये मुंबई पोलिस तुम्हाला मदत करेल.” अभिषेक बच्चन यांनी दिलेल्या या उत्तराने त्यांचे चाहते चांगलेच हैराण झालेत. या उत्तरानंतर एका युजरने लिहिले की, “तुमचा पीआर मला खूपच त्रास देत आहे. निर्लज्ज बच्चन.”
यावर अभिषेक बच्चन यांनी उत्तर दिले, “मॅडम, माझा कोणताही पीआर नाही.” अभिषेक बच्चन यांच्या काही चाहत्यांनी त्यांना सांगितले की, अशा लोकांच्या प्रश्नांकडे किंवा त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. खरंतर ही काही पहिल्यांदा घडलेली गोष्ट नाही, याआधीही अनेकांनी अभिषेक बच्चन यांना ट्रो.ल केले होते, पण तेही कधी उत्तर द्यायला घाबरले नाही. त्यांनी अगदी सडेतोड उत्तर दिले.
महत्त्वाच्या बातम्या-
“सुशांतच्या मृ.त्युच्या आदल्या दिवशी रिया सुशांतला भेटली होती!”
रियाचा 10 वर्षे तुरुं.गवास अटळ? रियाच्या घरी एनसीबीला सापडली ‘ही’ धक्कादायक गोष्ट!
एका माशानं तिला केलं लखपती; मिळालेली रक्कम ऐकून हैराण व्हाल!
कोरोनाबाबत अत्यंत मोठी घडामोड; अशा प्रकारे कोरोनाचा आता हवेतच खात्मा होणार!
“हे न.शेत जगणारे नर्कातील किडे आहेत, यांना कोण आपला आदर्श समजणारय?”