सिद्धार्थच्या मृत्यूमागे आहे सुशांतच्या मृत्यूचं रहस्य?

मुंबई | सध्या सर्वत्र चर्चा चालू आहे ती फक्त  ‘बिग बॉस’ फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याच्या मृत्यूची. सिद्धार्थ शुक्लाने आज अचानक या जगाचा निरोप घेतला आहे. सिद्धार्थच्या अचानक जाण्याने अनेकांना मोठा धक्का बसला आहे. अद्याप देखील त्याच्या चाहत्यांचा या गोष्टीवर विश्वास बसत नाही. सिद्धार्थने अगदी कमी वयात प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे.

सिद्धार्थचा मृत्यू ह्रद्यविकाराच्या झटक्याने झाल्याचं बोललं जात आहे. एकिकडे त्याच्या मृत्यूने संपूर्ण मनोरंजन विश्व हादरलं आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावर त्याच्या मृत्यूच्यं नेमकं कारण काय, याबद्दल वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.

काही लोक सिद्धार्थच्या मृत्यूचा संबंध अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी जोडत आहेत. सिद्धार्थच्या प्रकृतीची माहिती समजल्यानंतर त्याला कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कूपर रुग्णालय हे सिद्धार्थच्या घरापासून अगदी जवळ तसेच एक प्रचलित रुग्णालय आहे.

सुशांत सिंह राजपूतची बॉडी देखील याच रुग्णालयात नेण्यात आली होती. यामुळे सोशल मीडियावर नेटकरी शंका व्यक्त करू लागले आहेत. अनेजकण सिद्धार्थची बॉडी कूपर रूग्णालयातच का नेण्यात आली, असा सवाल उपस्थित करत आहेत.

सुशांतप्रमाणे सिद्धार्थची बॉडी देखील कूपर रुग्णलयात नेण्यामागे काहितरी गूड नक्कीच आहे. सिद्धार्थचा मृत्यू हा ह्रद्यविकाराने नव्हे तर सुशांतप्रमाणे याची देखील ह,त्या करण्यात आली आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर चालू आहे.

सिद्धार्थ शुक्लाने 1 सप्टेंबरच्या रात्री काही औषधं घेतली होती. त्यानंतर तो आपल्या बेडरुमध्ये झोपला. परंतु सकाळी तो उठला नाही. यानंतर त्याला मुंबईच्या कूपर रूग्णालयात दाखल करण्यात आलं.

डॉक्टरांनी सिद्धार्थला चेक केल्यानंतर सिद्धार्थचा मृत्यू हृदयविकाराचा झटका आल्यानं झाला असल्याचं सांगितलं होतं. परंतु काही लोक आता या गोष्टीवर विश्वास ठेवण्यास तयार नाहीत. तर काही लोक याचा तपास करण्याची देखील मागणी करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

सिद्धार्थची संपत्ती ऐकूण तुम्ही देखील थक्क व्हाल, वाचा सविस्तर

सिद्धार्थच्या मृत्यूचे दु:ख शहनाजला असहय्य, वडिलांनी दिली तिच्या प्रकृतीबद्दल माहिती

कोणासोबत एक रात्र घालवशील? भूमी पेडणेकर म्हणते…

‘बिग बॉस’ फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे अकाली निधन

स्वत:च्याच लग्नात नवरीने केला भन्नाट डान्स, पाहा व्हायरल व्हिडीओ