बंडखोर आमदारांनी मुक्काम ठोकलेल्या गुवाहाटीच्या हॉटेलचं एकूण बिल किती?, आकडा वाचून थक्क व्हाल

मुंबई | शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा 8 दिवस गुवाहाटीच्या रॅडिसन ब्ल्यूमध्ये मुक्काम होता. बुधवारीच सर्व आमदार गोव्याला गेले. रॅडिसन ब्ल्यूमधील हॉटेलचं बिल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांनी भरलं आहे. आता या संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

आमदारांनी अन्य कोणत्या सुविधांचा लाभ घेतला का, असा प्रश्न हॉटेल अधिकाऱ्यांनी विचारण्यात आला. त्यावर खोलीच्या भाड्यात असलेल्या सुविधा वगळता आमदारांनी इतर कोणत्याही सोयी घेतल्या नाहीत, असं उत्तर अधिकाऱ्यांनी दिलं.

हॉटेल रॅडिसन ब्ल्यूच्या वेबसाईटनुसार एका खोलीचं भाडं 7,500 ते 8.500 रुपये इतकी आहे. सवलत आणि कर धरून 70 खोल्यांचं भाडं जवळपास 68 लाख रुपयांच्या घरात जातं. तर 8 दिवसांच्या जेवणावर झालेला खर्च अंदाजे 22 लाख रुपये इतका आहे.

बहुमत चाचणीला सर्व आमदार मुंबईत परत येतील. पण या आमदारांचा गुवाहाटीमधील खर्च तब्बल 70 लाखांच्या आसपास आहे. फक्त जेवणाचं बिल 22 लाख रुपयांचं असल्याची माहिती समोर आलीये.

डिसन ब्ल्यूचं आठ दिवसाचे बिल एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांनी भरलेय. त्यांचा एकूण खर्च हॉटेल व्यवस्थापनानं सांगितला नाही.

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस यांना हाताशी धरत त्यांनी सत्तास्थापनेचा दावा केला. त्यांच्यासोबत शिवसेनेच्या आमदारांसह अपक्ष अशा जवळपास 50 जणांचा पाठिंबा आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

टेबलावर चढून नाचणाऱ्या आमदारांना एकनाथ शिंदेंनी झापलं, म्हणाले… 

उपमुख्यमंत्री होताच देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी आरक्षणासाठी उचललं महत्त्वाचं पाऊल! 

उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना मोठा झटका; नेतेपदावरून केली हकालपट्टी 

“मी अजूनही बाळासाहेबांचा शिवसैनिक आणि शिवसेनेचा आमदार” 

शिंदे सरकारची 4 तारखेला बहुमत चाचणी, मुख्यमंत्री म्हणतात…