Top news महाराष्ट्र मुंबई राजकारण

“भाजपच्या माकडांना ही माहिती कुठून मिळाली, बायकांच्या पडद्याआड लपून खेळी करणं थांबवावं”

मुंबई | नुकतंच ईडीने संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना नोटीस बजावली आहे. 29 डिसेंबरला वर्षा राऊत यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ईडीने संजय राऊत यांच्या पत्नीला नोटीस बजावल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

संजय राऊत यांनी आज मुंबईकर पत्रकार परिषदेत घेतली होती. यावेळी राऊत यांनी ईडीच्या नोटीसवर सविस्तर भाष्य केलं आहे. तसेच संजय राऊत यांनी यावेळी भारतीय जनता पार्टीवर देखील हल्लाबोल केला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले की, ईडीनं अद्याप तरी त्यांच्या नोटिशीत पीएमसी बँक घोटाळ्याचा उल्लेख केलेला नाही. मग भाजपच्या माकडांना ही माहिती कुठून मिळाली? ते कालपासून उड्या कसे काय मारू लागले?

ईडी जरी भाजपचा पोपट असला तरी ती एक सरकारी संस्था असल्यानं माझ्या मनात ईडीबद्दल आदर आहेच. माझ्याकडे भाजपच्या 120 नेत्यांची यादी आहे. ते देखील ईडीच्या रडारवर येवू शकतात. गेल्या काही दिवसांपासून भाजपचे नेते ईडीच्या कार्यालयात जातात आणि तिथून काही कागदपत्रे घेवून बाहेर येतात, याचे पुरावे देखील माझ्याकडे आहेत, असंही संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं आहे.

तसेच महाराष्ट्राच्या या सरकारच्या मोहात पडू नका हे सरकार पाडायचं आम्ही ठरवलं असल्याचं भाजप नेते म्हणत आहेत. बायकांच्या पदराआडून लढाईची मोहीम तुमच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही,असा घणाघात संजय राऊत यांनी यावेळी विरोधी नेत्यांवर केला आहे.

दरम्यान, पत्नीला मिळालेल्या ईडीच्या नोटीसनंतर संजय राऊत यांनी यासंदर्भात आपल्याला काहीही माहित नसल्याचं म्हटलं होतं. मात्र, त्यानंतर संजय राऊत यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवरून काही गाण्याच्या ओळी शेअर करत अप्रत्यक्षपणे विरोधकांना थेट आवाहन केलं होतं.

संजय राऊत यांनी ट्वीटरवरून गाण्याच्या काही ओळी शेअर केल्या होत्या. ‘आ देखे जरा किसमे कितना है दम, जमके रखना कदम मेरे साथिया’, असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं होतं.

संजय राऊत यांनी केलेल्या या ट्वीटमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांना देखील नोटीस बजावण्यात आली होती. या वर्षाच्या शेवट म्हणजे 30 डिसेंबरला खडसे यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर रहावं लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! ‘या’ धक्कादायक कारणाने संजय राऊतांच्या पत्नीला ईडीने नोटीस बजावली

घाई करा!!! सोनं खरेदी करण्याची हीच आहे वेळ, 2021 मध्ये सोन्याचे भाव पोहचतील थेट….

राऊतांच्या पत्नीला ईडीची नोटीस मिळताच फडणवीसांची खोचक प्रतिक्रिया, म्हणाले…

पत्नीला ईडीची नोटीस मिळताच राऊतांची मोठी प्रतिक्रिया! गाण्याचे बोल लिहित थेट केलं आवाहन, म्हणाले…

‘शिवसेनेनं आम्हाला सल्ला देवू नये’; अशोक चव्हाणांचा संजय राऊतांवर हल्लाबोल!