पोझ देता-देता महिलेचा अचानक घसरला पाय अन्…, पाहा व्हिडीओ

पॅरिस | कोरोनाच्या काळात सरकारने अनेक कामकाजांवर बंदी घातली होती. त्यामध्ये पर्यटन स्थळांचाही समावेश होता. त्यामुळे त्याकाळामध्ये सर्वजण घरात बसून खूप कंटाळले होते. परंतू आता कुठं कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला पाहायला मिळत आहे. त्यामुळे पर्यटन स्थळही सुरू झाली आहेत.

पर्यटन स्थळ म्हटलं की, त्या ठिकाणच्या वेगवेगळ्या गोष्टी पाहणं. त्या ठिकाणच्या वस्तूंची माहिती करून घेणं. या सगळ्या गोष्टी आल्याच. पण याही महत्वाची गोष्ट म्हणजे, पर्यटना स्थळी गेल्यानंतर त्या ठिकाणचे फोटो काढणे. फोटो काढण्याचा आजकाल सगळीकडेच ट्रेंडच सुरू झाला आहे. जिथे जाऊ तिथे फोटो काढलेच पाहिजे, असं झालं आहे.

एकवेळेस बाहेर गावी गेल्यानंतर जेवण नाही केलं तरी चालेल. पण त्या ठिकाणी फोटो काढलेच पाहिजेत. तसेच सध्या सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये कधी अपघात झालेल्याचे असतात. तर कधी भांडणाचे असतात.

परंतू सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. व्हायरल होत असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये एक महिला आपला फोटो काढण्यासाठी एका ठिकाणी उभी राहिली आहे. पोझ बदलावी या विचारात ती दोन पाऊलं पुढे जाते. ती महिला ज्या ठिकाणी उभी राहिलेली आहे. ती जागेला थोडा स्लोप आहे. त्यामुळे पोझ बदलण्याच्या नादात तिचा पाय घसरतो आणि ती महिला जोरात खाली जमिनीवर कोसळते. या व्हिडीओमध्ये हे सगळं सुरू असताना, त्याच्या बॅकग्राऊंडला ‘सय्याने देखा ऐसे मे पानी पानी हो गई’ हे गाणं वाजत आहे.

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पॅरिसमधील असल्याचं समजतं आहे. व्हिडीओमधील महिलेने अबोली रंगाचा सलवार कुर्ता घातला आहे. त्याचप्रमाणे तिच्या हातामध्ये एक पर्स असल्याचंही दिसून येत आहे. तसेच ऊन लागत असल्यानं त्या महिलेनं आपल्या ओढणीने तिचा चेहराही झाकून घेतला असल्याचं पाहायला मिळतं आहे.

हा व्हिडीओ ‘youglandlord01’ या यूजरने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत असून, या व्हिडीओला अनेक पसंतीही मिळत आहे. तसेच या व्हिडीओला अनेकांनी लाईक केलं आहे. त्याचप्रमाणे खूप लोकांनी यावर कमेंटही केल्या आहेत.

https://www.instagram.com/p/CSTmdcVh9Ke/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again

महत्वाच्या बातम्या-

अचानक कार आली समोर अन्…; त्यानंतर जे झालं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हिडीओ

गृहिणींनी बनवलं ‘या’ हिंदी गाण्याचं रिमेक, पाहा व्हायरल व्हिडीओ

न्यूड व्हिडीओमुळे चर्चेत आलेली ‘ही’ अभिनेत्री वयापेक्षा मोठं दिसण्यासाठी घ्यायची हार्मोनल इंजेक्शन्स!

दिल्लीत खलबतं सुरुच! शरद पवारांच्या उपस्थितीत विरोधकांची पुन्हा बैठक

वऱ्हाड निघालं लग्नाला! जमिनीवर लाॅकडाऊन, जोडप्यानं आकाशात…