“…तर किरीट सोमय्यांच्या डोक्याचा चिवडा झाला असता”, चंद्रकांत पाटलांची जहरी टीका

मुंबई | गेल्या काही दिवसांपुर्वी भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसैनिक यांच्यामध्ये पुणे महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये बाचाबाची झाली होती. यामध्ये किरीट सोमय्या काही प्रमाणात जखमी झाले होते.

त्यानंतर भाजपकडून राज्य सरकारवर जोरदार टीका करण्यात आली होती. त्यातच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

सर्व सत्तेचा दुरूपयोग चालला आहे. किरीट सोमय्यांवर प्राणघातक हल्ला झाला होता. व्हिडीओ क्लिपमध्ये दिसत आहे की, एकजण मोठा दगड घेवून मागे धावतो आहे. त्यामुळे त्यांच्या डोक्याचा, मेंदुचा चिवडाच झाला असता, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

किरीट सोमय्या यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.

तसेच ज्या पायरीवर किरीट सोमय्या यांना ढकलण्यात आले, त्या पायरीवर त्यांचा सत्कार करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांवर मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा सत्तेचा मोठा दुरूपयोग आहे. त्याला भाजपा घाबरणार नाही, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांकडून हल्ला करण्यात आल्यानंतर चंद्रकांत पाटलांनी अनेक आरोप महाविकास आघाडी सरकारवर केले होते. किरीट सोमय्या यांना ठार मारण्याचा हेतू होता.

हे गुंडाराज असून किरीट सोमय्यांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ आली असती, असं चंद्रकात पाटील यांनी म्हटलं होतं. हल्ला झाला त्यावेळी पोलिस काय करत होते, असे सवालही त्यांनी केले होते.

किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला करून काहीही साध्य होणार नाही. ही घटना लक्षात घेता पुणे पोलिसांनी सुमेटो गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केली होती.

दरम्यान, ही दंगल होती. निषेध  हा शब्द बोथट असून आम्ही शांत बसणार नाही, असं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं होतं. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या सांगण्यावरून ही धक्काबुक्की करण्यात आली  होती, असा आरोप भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केला होता.

महत्वाच्या बातम्या- 

निवडणुकीआधी काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचा राजीनामा; तब्बल 46 वर्षांनंतर ‘हात’ सोडला

मुंबईत ईडीची मोठी कारवाई! कुख्यात गुंड दाऊदच्या संबंधितांवर छापेमारी

 ‘या’ कंपनीच्या शेअर्सने अवघ्या 10 महिन्यांत गुंतवणुकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे झाले 66 लाख

‘विश्वासात आणि श्वासात तू आहेस….’; अमृता फडणवीसांनी केली नव्या गाण्याची घोषणा

केंद्र सरकारने केला पीएफमध्ये ‘हा’ महत्त्वाचा बदल; लाखो लोकांना होणार फायदा