‘… तर 2022 मध्ये कोरोना संपणार’; WHO प्रमुखांनी दिली दिलासादायक माहिती

नवी दिल्ली | दोन वर्षापूर्वी आलेल्या कोरोना महामारीने जगभर हाहाकार माजवला होता. जगभर आलेल्या कोरोनाच्या दोन लाटांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं दिलासादायक चित्र काही महिन्यांपूर्वी दिसत होतं. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढायला पुन्हा सुरूवात झाली आहे. अनेक देश कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर जाऊन ठेपले आहेत.

कोरोना महामारीच्या सुरूवातीपासूनच कोरोनाबद्दल वेगवेगळे दावे केले जात आहेत. अनेक दाव्यांमुळे जगाचं टेन्शन वाढलं असलं तरी जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी दिलासादायक दावा केला आहे.

2022 मध्ये कोरोना संपेल असा दावा जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी केला आहे. कोरोना महामारीला संपवायचं असेल तर सर्व देशाच्या सरकारने मिळून काम केलं पाहिजे, असं मत देखील WHO प्रमुखांनी व्यक्त केलं आहे.

2022 या नवीन वर्षात सर्वांनी मिळून कोरोनावर मात करूया. यासाठी सर्व देशांनी एकत्र काम केलं पाहिजे. येत्या वर्षात कोरोनाला संपवायचं असेल तर विषमता संपवली पाहिजे, असं वक्तव्य जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख अॅडनोम गेब्रेयसस यांनी केलं आहे.

कोरोनाला संपवायचं असेल तर प्रत्येक देशाने किमान 70 टक्के लसीकरण पुर्ण करणे आवश्यक आहे, अशा सूचना गेब्रेयसस यांनी दिल्या आहेत.

सर्व देशांनी एकत्र येत जास्तीत जास्त लसीकरणावर भर दिला तर कोरोना लवकरच संपेल, असा दावा जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख अॅडनोम गेब्रेयसस यांनी केला आहे.

दरम्यान, भारतासह ब्रिटन, युरोप, दक्षिण आफ्रिका, अमेरिका यासारख्या देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जग सज्ज झालं आहे. मात्र, कोरोनाचा वाढता धोका बघता अनेक देशांनी पुन्हा एकदा निर्बंध घालायला सुरूवात केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

“लगान टीमनेच इंग्रजांना पळवून लावलेलं, महाराष्ट्रातील इंग्रज सत्तेबाहेर आहेत तेही लगान टीममुळेच”

मोठी बातमी! वैष्णोदेवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत दोन महिलांसह 12 भाविकांचा मृत्यू

धक्कादायक! मुंबईतील 55 टक्के कोरोना पॉझिटिव्ह नमुन्यात आढळला ओमिक्रॉन

अजित पवारांनी सांगितला नवीन वर्षाचा संकल्प, म्हणाले…

जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या Omicron बाबत दिलासादायक माहिती समोर!