Omicron च्या पार्श्वभूमीवर WHO ने भारताला दिला ‘हा’ मोलाचा सल्ला

मुंबई | कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनने जगभर धुमाकूळ घातला आहे. याची सुरुवात दक्षिण अफ्रिकेमधून झाली होती. मात्र आता भारतामध्ये देखील या विषाणूने शिरकाव केला आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.

ओमिक्राॅनचा (Omicron) वाढता संसर्ग पाहता आरोग्य विभागाचंही टेंशन वाढलं आहे. ओमिक्राॅननं धोका अधिक वाढला असून आता बूस्टर डोस द्यावा असं म्हटलं जात आहे. अशातच WHO ने भारताला दिला महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

चिंता वाढवली असताना लसीकरण न केलेल्या लोकसंख्येचं प्रथम लसीकरण करण्याऐवजी बूस्टर डोसची (Booster Dose) घाई करणं योग्य नाही, असं डाॅ. ऑफ्रिन म्हटलं. संपूर्ण लोकसंख्येला लसीकरण करून संसर्गाचा प्रसार कमी करण्याचा भारताचा दृष्टीकोन योग्य आहे, असंही डाॅ. ऑफ्रिन म्हटलं.

दरम्यान, ओमिक्राॅनचा (Omicron) वाढता संसर्ग पाहता लवकरच देशात कोरोनाची तिसरी लाट येईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ओमिक्राॅन व्हेरिएंटची ही लाट फेब्रुवारी महिन्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू यासारखे प्रतिबंध करण्यात आले होते. त्याच पद्धतीच्या उपाययोजनांची पुन्हा एकदा अंमलबजावणी करावी लागेल, तरच आपण ओमिक्रॉनच्या प्रसाराला रोखू शकतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

ओमिक्रॉनच्या प्रसाराचा वेग हा कोरोनाच्या इतर व्हेरिएंटपेक्षा कितीतरी पेटीने अधिक आहे. तसेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोरोना नियमांचं काटेकोरपणे पालन करावं, हात स्वच्छ धुवावेत, मास्कचा नियमित वापर करावा, सॅनिटायझर वापरावं, असं आवाहन केलं जात आहे.

कोरोनाचा हा नवा विषाणू कोरोनाच्या डेल्टापेक्षा कमी घातक असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे. दक्षिण अफ्रिकेमध्ये ओमिक्रॉनचा कसा प्रसार होतो, याकडे आमचं लक्ष असून त्यानुसार भारतामध्ये त्याच्या प्रसाराचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या- 

पोस्टाची बंपर योजना; बँकेपेक्षा मिळतोय अधिक परतावा 

“…म्हणून शिवेंद्रराजे भोसले अध्यक्ष होऊ शकले नाहीत” 

‘मेरे उतने बिग बूब्स नही जो मे…’; ‘त्या’ वक्तव्यामुळे नीना गुप्ता पुन्हा चर्चेत 

महाराष्ट्रातील ‘या’ बँकेवर RBI ची मोठी कारवाई; ग्राहकांना झटका