बिपीन रावत यांच्या निधनानंतर नवे सीडीएस कोण होणार?; ‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याचं नाव चर्चेत

मुंबई | सीडीएस बिपीन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांचं तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu ) हेलिकॉप्टर दुर्घटनेत (IAF Helicopter Crash) निधन झालं आहे. रावत यांच्या निधनानंतर त्यांची जागा कोण घेणार? याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

सीडीएससारखं सर्वोच्च लष्करी पद हे फार काळ रिकामं नाही ठेवता येणार. त्यातही चीन आणि पाकिस्तानच्या ज्या कुरापती सुरु आहेत. त्यामुळे सीडीएस पदाची सूत्र कोणाकडे याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.

सध्या बिपीन रावत यांच्या जागेवर मराठमोळे अधिकारी सध्याचे लष्कर प्रमुख मनोज मुकूंद नरवणे (Gen Naravane) यांच्या नावाची चर्चा आहे. काल पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली सीसीएसची मिटींग झाली. ही कमिटीत देशाच्या लष्करासंबंधीच्या सर्व निर्णयाची चर्चा होते.

बिपीन रानत गेल्या काही काळापासून जे प्रोजेक्ट सुरू केलेते त्याबाबची माहिती अधिकारी मनोज मुंकंद नरवणे यांना सर्वात जास्त आहे. सध्या  सीडीएसच्या पदासाठी जनरल नरवणेंची जी पात्रता, अनुभव आहे ती इतरांकडे नाही. त्यामुळेच जनरल नरवणेंचं नाव आघाडी असल्याचं कळतंय.

दरम्यान, सीडीएस बिपीन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांचं पार्थिव गुरुवारी सायंकाळपर्यंत एका सैन्यदलाच्या विमानानं राजधानी दिल्लीमध्ये आणलं जाईल. त्यानंतर शुक्रवारी सकाळी रावत आणि त्यांच्या पत्नीचं पार्थिव त्यांच्या घरी नेण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत अंत्यदर्शानासाठी वेळ देण्यात येईल.

कामराज मार्गावरुन दिल्ली छावणीतील बराड स्मशानभूमीपर्यंत त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येईल. अंत्यसंस्कारासाठी रावत यांची छोटी बहीण आणि भाऊ उपस्थित राहणार आहेत. जनरल रावत यांना दोन मुली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘…तर मृत्यूचं तांडव टळलं असतं’; लँडींगसाठी फक्त 90 सेकंद हवे होते, त्या 90 सेकंदात नेमकं काय घडलं? 

“…तेव्हाच अशा घटना होतात, मला घातपाताची शक्यता वाटते”

‘काय नाव होतं त्यांचं, काय ते’; बिपीन रावतांना श्रद्धांजली देतानाचा सदावर्तेंचा व्हिडीओ व्हायरल 

CDS बिपीन रावतांच्या निधनानंतर सोनिया गांधींनी घेतला ‘हा’ निर्णय! 

लष्कराच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत CDS बिपीन रावत यांचं दुर्दैवी निधन!