सोलापूर | रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडीसरकार विरोधात रान उठवलं आहे. माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे आक्रोश महाराष्ट्राचा या कार्यक्रमामध्ये राज्य सरकारवर जोरदार टीका करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फ़डणवीसांचं कौतुक केलंय. त्यातच पुन्हा एकदा सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकावर टीका केली आहे.
राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून येणार आहेत. यावर आमचा ठाम विश्वास आहे. परंतु, आम्हाला वेगळे देवेंद्र फडणवीस पाहायचे आहेत, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस पुन्हा येणार आहेत. त्यावेळी मात्र बारामतीच्या गड्यांना आत घेऊ नका. उजनीतून बारामतीला एक थेंबही पाणी जाऊ देणार नाही, असं सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.
पालकमंत्र्यांनी कंस मामाची भूमिका घेऊ नये, अन्यथा श्रीकृष्णरूपी देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने कंस मामाला आम्ही गाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.
सदाभाऊ खोत यांनी यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरही टीका केली आहे. शरद पवार यांना कधीही शेतकऱ्यांचा जाणता राजा म्हणणार नाही. राज्यामध्ये सहकारी चळवळीचे श्राद्ध घालण्याचे काम बारामतीकरांनी केलं आहे, असं सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.
जिल्हा बँकासह सहाकारी संस्था यांनी संपुष्टात आणल्या आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्यांचा संसार मातीत मिसळला, अशी जोरदार टिका सदाभाऊ खोत यांनी केली.
आक्रोश महाराष्ट्राच्या यात्रेमध्ये बोलताना सदाभाऊ खोत यांनी देवेंद्र फडणवीसांची स्तुती केली होती. सदाभाऊ खोत यांना आता आमदारकी हवी आहे त्यामुळे ते सभा घेतात, विरोधक टिका करतात, असं सदाभाऊ खोतांनी सांगितलं.
दरम्यान, 30 वर्ष हा पठ्या चळवळीमध्ये काम करत आहे. अनेकवेळा तुरूंगात गेलो आहे, बाहेर आलो. आम्ही आमदारकीसाठी जन्माला आलेलो नाही. आमचा जीव आमदराकीमध्ये नाही तर आमचा जीव सामान्य माणसामध्ये आहे, असं सदाभाऊ खोतांनी म्हटलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या-
केतकी चितळेवर शेजाऱ्यांचे अत्यंत गंभीर आरोप, म्हणाले…
‘गांXX दम असेल तर मला उचलून दाखवा’; प्रकाश आंबेडकरांची जीभ घसरली
जाहीरातदार बीसीसीआयवर भडकले, जाणून घ्या काय आहे प्रकरण
नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ! दाऊद प्रकरणात न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी
आयपीएलच्या पुढील हंगामात चैन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदी पुन्हा धोनीच