Laapataa Ladies Special Offer l किरण राव यांचा ‘लपता लेडीज’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. आता या चित्रपटाबाबत एक खास ऑफर आली आहे. चित्रपट निर्माते किरण राव यांनी त्यांच्या चाहत्यांना एक मोठे सरप्राईज दिले आहे. महिला दिनानिमित्त या चित्रपटाच्या तिकिटाची किंमत 100 रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे ‘लपता लेडीज’ हा चित्रपट तुम्ही ‘महिला दिना’ला फक्त 100 रुपयांमध्ये पाहू शकता.
Laapataa Ladies Special Offer l महिला दिनाला 100 रुपयांमध्ये पाहता येणार चित्रपट :
आमिर खानची निर्मिती असलेल्या या चित्रपटाला समीक्षकांसोबतच अनेक सिनेतारकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अशा स्थितीत या चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होणार आहे. तसेच या चित्रपटाला IMDB वर 8.1 रेटिंग देखील मिळाली आहे.
‘लपता लेडीज’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, 6 दिवसांचे एकूण कलेक्शन आता 5.45 कोटी रुपये झाले आहे. 5 कोटींच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटने खर्च वसूल केला आहे. त्यामुळे ‘लपता लेडीज’ हा चित्रपट तुम्ही ‘महिला दिना’ला अवघ्या 100 रुपयांमध्ये पाहू शकता.
Laapataa Ladies Special Offer l या दिग्गज कलाकारांनी साकारली महत्वाची भूमिका :
किरण राव यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट एक कॉमेडी-ड्रामा चित्रपट आहे. ज्यामध्ये ग्रामीण भागाची कथा दाखवण्यात आली आहे, जी खूप मजेदार आहे. चित्रपटाची कास्टिंगही अप्रतिम आहे. या चित्रपटामध्ये रवी किशन, नितांशी गोयल, प्रतिभा रंता, स्पर्श श्रीवास्तव आणि छाया कदम यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
किरण आणि आमिरने आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कोणतीही कसर सोडली नाही. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आमिर आणि किरण संपूर्ण स्टारकास्टसह देशभरातील वेगवेगळ्या शहरात गेले. याआधी किरण रावने ‘धोबी घाट’ दिग्दर्शित केला होता, जो प्रेक्षकांना खूप आवडला होता.
News Title : Woman Day Special Laapataa Ladies Movie Offer
महत्त्वाच्या बातम्या-
ना बॅटरी, ना पेट्रोल खर्च, कारमध्ये बसवा Mini Solar AC
आजचे राशिभविष्य! या राशीच्या व्यक्तींने प्रवासात अत्यंत सावधानता बाळगावी
मनोज जरांगे पाटलांना सर्वात मोठा धक्का!
भन्नाट फीचर्ससह ZS EV इलेक्ट्रिक कार बाजारात लाँच; मिळणार जबरदस्त फायदे
‘ओम नमः शिवाय’; या नियमांचे पालन करून महाशिवरात्रीला रुद्राक्ष धारण करा