Mini Solar AC l उन्हाळ्यात कारमधून प्रवास करणे थोडे कठीण असते. कडक उन्हामुळे गाडीचे तापमान खूप वाढते आणि ते सहन करणे देखील शक्य नसते. मात्र आता या समस्येवर मात करण्यासाठी अनेकजण कारचा एसी वापरतात, मात्र एसी चालवल्याने कारच्या ऊर्जेवर दबाव येतो. म्हणजेच एसी सुरु केला तर प्रदूषण वाढते. म्हणूनच आज आपण मिनी सोलर एसीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत जे तुम्हाला थंड हवा देईल.
नुकताच बाजारात एक नवीन मिनी सोलर एसी आला आहे जो कारला थंड ठेवण्याचा उत्तम मार्ग आहे. यामुळे तुमची कार थंड तर होईलच पण पर्यावरणासाठीही चांगली आहे. हा सौरऊर्जेवर चालणारा मिनी एसी आहे. मात्र तुम्हाला हे माहित आहे का? मिनी सोलर एसीची किंमत किती आहे.
Mini Solar AC l मिनी सोलर एसी कसे काम करते? :
मिनी सोलर एसी हा लहान सोलार पॅनल आणि पंख्याचा तयार केला आहे. सोलर पॅनल सूर्यप्रकाशापासून वीज निर्माण करतो आणि ही वीज पंखे चालवते. ज्यावेळी पंख चालू होतो तेव्हा गाडीच्या आत थंड हवा येते. तुम्ही ते कारच्या आरशावर टांगू शकता. याशिवाय सोलर पॅनलचा काही भाग कारच्या बाहेर राहील तर कूलरचा काही भाग कारच्या आतमध्ये राहील अशा स्वरूपाचा बसवा.
Mini Solar AC l मिनी सोलर एसीचे फायदे :
पर्यावरणपूरक : मिनी सोलर एसीमुळे प्रदूषण होत नाही.
बचत : सर्वात महत्वाचं म्हणजे मिनी सोलर एसी हा विजेवर चालत नाही. यामुळे कारची बॅटरी संपत नाही आणि ऊर्जेची बचत होईल.
पोर्टेबल : हा एसी खूपच लहान आणि हलका आहे, त्यामुळे तो सहजपणे फिरता येतो.
सुलभ स्थापना : सुलभ स्थापना स्थापित करणे फारच सोपे आहे. ते कारच्या आरशावर टांगले जाऊ शकते. तसेच मिनी सोलर एसीची किंमत 4,415 रुपये आहे.
News Title : Car Mini Solar AC
महत्त्वाच्या बातम्या-
आजचे राशिभविष्य! या राशीच्या व्यक्तींने प्रवासात अत्यंत सावधानता बाळगावी
मनोज जरांगे पाटलांना सर्वात मोठा धक्का!
भन्नाट फीचर्ससह ZS EV इलेक्ट्रिक कार बाजारात लाँच; मिळणार जबरदस्त फायदे
‘ओम नमः शिवाय’; या नियमांचे पालन करून महाशिवरात्रीला रुद्राक्ष धारण करा
विदर्भ आणि मुंबई यांच्यात होणार रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना! कोण वरचढ ठरणार