मनोज जरांगे पाटलांना सर्वात मोठा धक्का!

Manoj Jarange Patil | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा राज्यभर दौरा करत आहेत. ओबीसीमधून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन करत राहणार असं जरांगेंनी स्पष्ट सांगितलं होतं. त्यामुळे जरांगे सध्या राज्यभर सभा घेत आहेत. जरांगेंच्या सभेला लाखो मराठा बांधव पाठिंबा देत आहेत. सोलापूर, बीड नंतर जरांगेंची नांदेड येथे सभा पार पडली. दरम्यान, सभा झाल्यानंतर जरांगेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा राज्यभर दौरा सुरु केला आहे. बीड, बार्शीनंतर जरांगेंची नांदेड येथे चांदोजी पावडे मंगलकार्यालय येथे सभा पार पडली. मात्र ही सभा जरांगेंच्या चांगलीच अंगलट आली आहे. या मागचं कारण म्हणजे, सभेनंतर जरांगेंवर आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रात्री 11.30 वाजता जरांगे नांदेड येथे पोहोचले. या वेळी जरांगेंचं चांदोजी पावडे मंगलकार्यालयामध्ये धूमधडाक्यात स्वागत देखील करण्यात आलं. एवढंच नाही तर त्यांच्या स्वगतासाठी फटाक्यांची आतिषबाजी देखील केली. सभेवेळी ध्वनीक्षेपकाचा आवाज रात्रभर सुरू ठेवल्याने (Manoj Jarange Patil) मनोज जरांगे पाटील आणि आयोजक श्याम वडजे यांच्यावर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

पुढे काय घडलं?

जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आणि रात्री ध्वनीक्षेपकाचा आवाज आवाक्याबाहेर सोडल्याच्या कलमान्वये आयोजक आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर भाग्यनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं असून ही सभा रात्री साडे बारा वाजता संपली. ही सभा घेण्यास कोणतीही परवानगी मनोज जरांगे पाटील यांनी घेतली नसल्याने आयोजक आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

आंदोलन सुरुच राहणार-

सध्या मराठा आरक्षणाचा विषय चांगलाच चर्चेत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी मराठा बांधवांच्या आग्रहाखातर आपलं उपोषण मागे घेतलं आहे. मात्र जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी लढत राहणार असं म्हटलं आहे.

News Title : manoj jarange patil case registered at nanded

महत्त्वाच्या बातम्या-

भन्नाट फीचर्ससह ZS EV इलेक्ट्रिक कार बाजारात लाँच; मिळणार जबरदस्त फायदे

‘ओम नमः शिवाय’; या नियमांचे पालन करून महाशिवरात्रीला रुद्राक्ष धारण करा

विदर्भ आणि मुंबई यांच्यात होणार रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना! कोण वरचढ ठरणार

हर हर महादेव..! भारतातील या शहरांमध्ये मोठ्या थाटामाटात महाशिवरात्री साजरी करा

भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांचं तिकीट फायनल? कोण आहेत मुरलीधर मोहोळ