‘व्हॅलेंटाईन डे’ला महिलेचा हायव्होल्टेज ड्रामा, नवऱ्याला खेचत पोलीस ठाण्यात नेलं अन्…

मुंबई | वर्षभरात मनात दाटलेल्या प्रेमाच्या भावना व्यक्त करण्याचा महत्त्वाचा आठवडा म्हणून सर्व प्रेमी व्हॅलेंटाईन वीकची वाट पहात असतात. फेब्रुवारीच्या गुलाबी थंडीत प्रेमाची भावना व्यक्त करण्याचा एक महत्त्वाचा क्षण या आठवड्यात येतो.

अशातच आता व्हॅलेंटाईन डे वर महिलेने मोठा राडा घातल्याचं पहायला मिळालं आहे. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी जिथे एकीकडे कपल्स एकमेकांवर प्रेम व्यक्त करत असतात.

मात्र, सोमवारी टिकमगडमध्ये एक महिला आपल्या नवऱ्याला भररस्त्यात मारहाण करताना दिसली. महिलेने नवऱ्याची कॉलर पकडून त्याला 1 किलोमीटरपर्यंत ओढल नेलं. दोघांनी थेट पोलिस स्टेशन गाठलं.

सूटबूट घातलेल्या महिलेने पतीला शिवीगाळ करत कॉलर पकडून जबरदस्तीने ओढत पोलीस ठाण्यात नेलं. महिलेशी एक महिन्यापूर्वी टिकमगड येथील कुंडेश्वर धाम मंदिरात लग्न केलं होतं.

मात्र त्याची पत्नी सकाळपासून घराला कुलूप लावून काही न सांगता निघून जाते, असं पती म्हणाला. पत्नी रोज मारहाण करते आणि धमक्या देते. वैतागून त्यानं घर रिकामं केलं आणि सामान दुसऱ्या ठिकाणी हलवलं, असं पतीने सांगितलंय.

याचाच राग आल्यानं पत्नीने त्याला पकडून बेदम मारहाण केली आणि जबरदस्तीने टीकमगड पोलीस स्टेशन कोतवालीला आणलं.

मात्र, पोलिसांच्या समजुतीनंतर पती-पत्नी तक्रार न नोंदवता घरी पाठवलं. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्याचं पहायला मिळतंय.

महत्त्वाच्या बातम्या – 

अमृता फडणवीस म्हणतात, “आज फिर एक बिल्लीने दहाड़ने की कोशिश की है…”

युक्रेन-रशिया संघर्ष टोकाला! हल्ला होण्याची भीती असताना रशियाने केली ‘ही’ मोठी घोषणा

“ईडीच्या कार्यालयात रोज दही-खिचडी खातो, याच्या बापाचं राज्य आहे का इथं?”

“सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला तर…”; संजय राऊत यांचा भाजपला मोठा इशारा

“तो जो कोण बोलतोय दलाल, ज्याला मराठीत भडवा म्हणतात”