लॉर्डस | आज क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक लॉर्डस मैदानावर विश्वचषकातला न्यूझीलंड विरूद्ध इंग्लंड यांच्यात अंतिम सामना होत आहे. आज क्रिकेट जगताला नवा जग्गजेता मिळणार आहे. विश्वचषक जिंकणाऱ्या टीमवर आयसीसी बक्षिसांचा वर्षव करणार आहे.
विश्वचषक जिंकणाऱ्या टीमला आयसीसीकडून 40 लाख डॉलर म्हणजे 27 कोटी 46 लाख 50 हजार रूपये मिळणार आहेत. आयसीसीकडून साखळी फेरीत मॅच जिंकणाऱ्या प्रत्येक टीमला २७ लाख ४६ हजार ५०० रुपये मिळणार आहेत.
न्यूझीलंड आणि इंग्लंड या दोन्ही संघ आत्तापर्यंत विश्वचषक जिंकू शकले नाहीत. अनेकदा या दोन्ही संघांनी बाद फेरीत प्रवेश केला खरा पण त्यांना विजय मिळवता आला नाही.
दरम्यान, भारतीय संघावर देखील आयसीसी आणि बीसीसीआयने बक्षिसांची खैरात केली आहे. टीम इंडियाला आयसीसी एकूण ७ कोटी ५५ लाख २८ हजार रुपये देणार आहे.