घरभाड्याच्या बदल्यात सेक्स, ‘या’ देशात दिली जातेय सेक्स फॉर रेंटची ऑफर

आयर्लंड | आयर्लंडमध्ये सेक्सच्या बदल्यात भाडं देण्याची घटना समोर आली आहे. यामध्ये घराचा मालक सेक्सच्या बदल्यात भाडेकरूकडून पैसे घेत नाही किंवा फार कमी घेतो.

आयर्लंडमध्ये सध्या सेक्स फॉर रेंटच्या जाहिराती छापल्या जात आहेत. या ट्रेंडवर तेथील सरकार देखील नाराज असल्याचं दिसतंय. आयरिश मंत्र्यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे.

आयर्लंडमध्ये घरांची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. त्यामुळे घरमालकांनी भाड्यात लक्षणीय वाढ झाली आहे. भाडेकरू वाढलेली किंमत पूर्ण करू शकत नाहीत आणि त्यांना कमी सेक्स फॉर रेंटची ऑफर दिली जाते.

फक्त महिला आणि मुलींसाठी ही खास ऑफर दिली जात असल्याचं दिसून आलं आहे. अनेकांनी या विषयावर आवाज देखील उठवला आहे. हा फक्त सेक्स नसून रेप असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.

मुलींच्या किंवा महिलांच्या गरजेचा फायदा घेऊन जर ही कृती केली जात असेल तर तो सेक्स नाही तर बलात्कार आहे, असं अनेकांनी म्हटलं आहे.

आयर्लंड सरकारने सेक्ससाठी भाड्याच्या जाहिरातींचा निषेध केला आहे आणि लोकांना अशा गोष्टींची तक्रार करण्याची विनंती आयर्लंड सरकारने केली आहे. त्यांच्या कारवाईची मागणी केली जात आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून आयर्लंडमध्ये मोठ्या प्रमाणावर घरांच्या किंमती वाढल्या आहेत. कोरोना काळानंतर अनेकांनी घरभाड्यात मोठी वाढ केली होती. त्यानंतर हा सेक्स ट्रेंड आयर्लंडमध्ये होताना दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या –

फिरायला आलेल्या तरुणीवर तीन मित्रांचा बलात्कार, अत्यंत धक्कादायक घटना

 मृत्यू जवळ आला होता तेवढ्यात… आईच्या एका कृतीनं मुलीला जीवदान!

 कृष्ण प्रकाश यांच्या ‘त्या’ कारनाम्यावर गृहमंत्र्यांना हसू अनावर, म्हणाले…

 …म्हणून भर स्टेजवर पंकजा मुंडेंच्या डोळ्यात आलं पाणी, पाहा व्हिडीओ

अभिजित बिचुकले ‘या’ अभिनेत्रीला भिडला; बिग बॉसच्या घरात धक्कादायक प्रकार