वाह! ‘वदनी कवळ घेता…..’ म्हटल्याशिवाय जेवणाला स्पर्शही न करणाऱ्या कुत्र्यांचा व्हायरल व्हिडीओ, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली| रोज वेगवेगळ्या प्रकारचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. रोज काही ना काही मजेशीर, आश्चर्यचकीत करणारे तर काही बरंच काही शिकवून जाणारे व्हिडीओ सोशल मीडियावर पहायला मिळतात.

काही व्हिडीओ तर आपल्याला प्रेरणा देणारे असतात. तर काही काही व्हिडीओंवर आपल्याला विश्वासही बसत नाही. आपण सोशल मीडियावर लहान पक्षु-पक्षांचे अनेक सुंदर व्हिडीओ व्हायरल झालेले पाहतो.

बऱ्याचदा आपण आपल्या पशु-पक्षांना अनेक गोष्टी शिकवत असतो. त्यांना चांगल्या गोष्टींची सवय लावण्याचा प्रयत्न करत असतो. सवयीनं तेही आपण शिकवलं तसंच वागू लागतात.

असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर पहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक लोक कौतुकदेखील करत आहे.

या व्हिडीओमध्ये एक महिला आपल्या पाळीव प्राण्यांना जेवणापूर्वी प्रार्थना करण्यास शिकवत आहे. महिला हात जोडून जेवणापूर्वी करण्याची प्रार्थना ‘वदनी कवल घेता…’ बोलत आहे आणि ते दोघे शांतपणे बसले आहेत. महिलेची प्रार्थना संपल्यानंतर, तिने त्या दोन पिल्लांना हात केल्यानंतर ते खाण्यासाठी जेवणाच्या भांड्यांकडे वळले. तोपर्यंत ते समोरील जेवणाला स्पर्शही करत नाहीत.

हा व्हिडीओ ट्विटर वापरकर्त्या वैशाली माथूर यांनी शेअर केला आहे. माझ्या मैत्रिणीने तिच्या पिल्लांना जेवणाआधी प्रार्थना करण्याचं शिकवल्याचा हा व्हिडीओ शेअर करत आहे.’ असं लिहत वैशाली यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

व्हिडीओला अनेक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडीओमध्ये महिलेने दोन कुत्र्यांना आपापल्या भांड्यांत खाण्यासाठी दिल्याचं दिसतंय आणि प्रार्थनेनंतर खाण्यासाठी ते दोघेही धीराने वाट पाहत असल्याचं दिसतंय.

हा व्हिडीओ पाहिल्यावर आपोआप चेहऱ्यावर सुंदर हास्य आल्याशिवाय राहणार नाही. व्हिडीओवर अनेक लोकांनी लाईक्स, कमेंटचा वर्षाव केला आहे. व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस उतरत आहे.

 

महत्वाच्या बातम्या – 

IPL 2021: के. एल. राहूलऐवजी ‘हा’ खेळाडू झाला…

IPL 2021: पंजाबला मोठा धक्का, कर्णधार के एल राहून…

‘दाढी करा आणि जे केलंय ते निस्तरायला सुरुवात…

दिशा पाटणीला केलेल्या किसींग सीनविषयी सलमान खाननं सोडलं मौन,…

कोरोनाच्या नियमांचं पालन करत नवरा-नवरीनं काठीच्या सहाय्यानं…