बाबो! ‘या’ ड्रायव्हरनं असं काही केलं की गेंड्यानं गाडीला दणादण आदळलं; पाहा व्हिडीओ

मुंबई | सोशल मीडियावर अनेक वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ आपलं मनोरंजन करुन जातात. तर काही व्हिडीओ आपल्याला धडकी भरवतात. सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्राण्यांचे व्हिडीओ देखील आपल्याला पाहायला मिळतात.

सध्या असाच एक जंगली जनावर आणि त्याचा पाठलाग करणाऱ्या एका गाडीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला देखील धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. जंगलातील हिंस्त्र प्राण्यांचा पाठलाग करून त्यांना त्रास देणं हे प्रसंगी जिवावर देखील बेतू शकतं. मात्र, काही लोकांना हे साहसी काम करायला खूप आवडतं.

सध्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक जंगली गेंडा शांत नदीच्या किनाऱ्यावरून जंगलाकडे चाललेला असतो. त्याच्या पाठीमागे एक फोर व्हिलर देखील चाललेली आहे. आपला कोणीतरी पाठलाग करत असल्याचं पाहून हा गेंडा थोडा विचलित होतो.

तो शांत चालू लागतो तर गाडीचा ड्रायव्हर देखील गाडीचं स्पीड कमी करतो. गेंडा जोराने चालू लागतो तर ड्रायव्हर देखील गाडीचं स्पीड वाढवतो. ड्रायव्हरचं हे वागणं गेंड्याला आवडत नाही. थोडं पूढे गेल्यानंतर गेंडा अचानक ड्रायव्हरला काही समजायच्या आत मागे वळून गाडीवर हल्ला करतो.

ड्रायव्हरला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी गेंडा कोणतीच संधी देत नाही. गेंडा त्या कारला जोरजोरात धडका देऊ लागतो. यामुळे ती कार अनेकवेळा पलटी होते. हा गेंडा गाडीचा अक्षरशः फुटबॉल करतो.

कारचं खूप सार नुकसान करुन देखील हा गेंडा शांत बसत नाही. तो गाडीला जोरजोरात धक्के देतच राहतो. गाडीला धक्के देऊन झाल्यानंतर गेंडा कारच्या समोर उभा राहतो आणि गाडीकडे पाहू लागतो. शेवटी तो तिथून निघून जातो.

almodeer1975 नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. युजरने हा व्हिडीओ शेअर करताच अगदी कमी वेळात सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर नेटकाऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडली आहे, याबद्दल माहिती मिळाली नाही. तसेच कारमध्ये असणाऱ्या व्यक्तीसोबत काय घडलं याबद्दल देखील माहिती मिळाली नाही. तुम्ही देखील हा व्हिडीओ नक्की पाहा.

महत्वाच्या बातम्या –

‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्राच्या ‘या’ लूकवर चाहते घायाळ, पाहा व्हायरल फोटो

आज ‘या’ भागात कोसळणार पाऊस, हवामान खात्याने दिला…

‘एवढी गचाळ का राहतेस?’; टीका करणाऱ्या महिलेला…

अहो काकी भाजी कितीला देणार?; ‘या’ फोटोमुळे…

‘तुझं गाणं कोण ऐकत, तू नाकातून गातो’, असं…