“होय, 100 टक्के खरंय मीच…”; बॉम्बस्फोटांबाबत फडणवीसांच्या आरोपावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य

मुंबई | डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचं औचित्य साधून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली होती. सलग 14 ट्विट करत फडणवीसांनी पवारांवर हल्लाबोल केला आहे.

मुंबई बॉम्बस्फोटांवेळी शरद पवारांनी अतिरिक्त बॉम्बस्फोटाची चुकीची माहिती दिल्याचा आरोप फडणवीसांनी ट्विटमध्ये केला होता. ज्यावेळी मुंबईत 12 स्फोट झाले होते. त्यावेळी शरद पवारांनी मुस्लीम भागात 13 बाॅम्ब शोधून काढला, असा आरोप फडणवीसांनी केला.

कायदा आणि सुव्यवस्थेऐवजी लांगुलचालन करण्याला त्यांचं प्राधान्य होतं, अशी टीका फडणवीसांनी ट्विट करत केली होती. त्यावर आता शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी आरोपावर उत्तर दिलं आहे.

फडणवीसांनी दिलेली आकडेवारी खरी आहे. मुंबईत 12 स्फोट झाले असताना मी 13 स्फोट झाल्याचं सांगितलं, हो ते 100 टक्के खरं आहे. ते मी केलं, असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. मुस्लीम भागाचं नाव घेतल्याचं देखील त्यांनी यावेळी मान्य केलं आहे.

शरद पवारांनी याच पत्रकार परिषदेत यामागील कारण देखील सांगितलं आहे. बाॅम्ब स्फोटाचं साहित्य पाहिल्यावर हा हल्ला भारताबाहेरील पाकिस्तानमधील शक्तींनी केल्याची माहिती मिळाली. त्यावेळी हिंदू आणि मुस्लीम ताण त्यांना वाढवायचा होता, हे देखील लक्षात आलं, असं शरद पवार म्हणाले.

मुंबईतील मुस्लीम यात नव्हते. मी मोहम्मद अली रोडचं 13वं नाव घेतल्याने धार्मिक दंगली झाल्या नाहीत, असंही शरद पवार यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

राज ठाकरेंच्या भाषणानंतर शरद पवारांना सतावते ‘ही’ चिंता, म्हणाले…

गुलाबराव पाटलांनी राज ठाकरेंना सुनावलं, म्हणाले “शिवसेनेच्या तुकड्यांवर तुम्ही…”

“एकेकाळी माझे पाय धरायचे, ते आता माझ्याविरोधात आणि पवारांवर बोलतात

‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून अलर्ट जारी 

संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट, राजकीय वर्तुळात खळबळ