मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्यात उत्तर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी गुडीपाडवा सभेवरून टीका करणाऱ्यांना राज ठाकरे यांनी चांगलंच फैलावर घेतलं.
राज ठाकरे यांनी भोंग्यांच्या मुद्द्यावरून जोरदार टोलेबाजी केली. त्यात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला. त्यावेळी त्यांनी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर खोचक शब्दांत टोलेबाजी केली.
मुंब्य्राच्या एका मदरसाच्या घरात, दाढीचा वस्तरा सापडला तर मी राजकारण सोडेन, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले होते. याला प्रत्युत्तर देताना मुंब्र्यातील अतिरेकी कारवायांची राज ठाकरेंनी यादीच वाचून दाखवली.
राज ठाकरे यांनी वस्तऱ्याचा उल्लेख करत ये शेपटं धरतो, गरगर फिरवतो फेकून देतो, असं आव्हान आव्डांना दिलं आहे. ज्यावेळी त्यांनी आव्हाडांची नक्कल देखील केली आहे.
राज ठाकरे यांनी या सभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर देखील कडाडून टीका केली आहे. त्याचबरोबर जयंत पाटील, सुप्रिया सुळे, अजित पवार यांचा देखील समाचार घेतला.
दरम्यान, राज ठाकरे यांनी आजच्या सभेत थेट ठाकरे सरकारला अल्टीमेटम दिला आहे. 3 मे पर्यंत मशिदीवरचे भोंगे उतरवा, आम्हाला कुठलीही तेढ निर्माण करायची नाही, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
राज ठाकरे यांची सुप्रिया सुळेंवर घणाघाती टीका, म्हणाले…
“शरद पवारांच्या घरी एसटीचे लोक जाणार, हे इंटेलिजन्सला कळलं कसं नाही?”
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली महत्त्वाची माहिती
Kirit Somaiya: वादात अडकलेल्या किरीट सोमय्यांना आठवले गोपीनाथ मुंडे, म्हणाले…
अभिनेत्री हेमांगी कवीच्या ‘बाई-बुब्स-ब्रा’ पोस्टनंतर आता ‘लिंबाच्या शक्ती’ची पोस्ट चर्चेत!