अभिनेता सोनू सूदने केलेला स्टंट पाहून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हिडीओ

मुंबई | सोशल मीडियावर आजकाल सर्वजण खूप अॅक्टिव्ह असतात. बॉलिवूड अभिनेत्री, अभिनेत्यांपासून ते सर्वसामान्य मुला-मुलींपर्यंत सोशल मीडियावर अनेकजण वेगवेगळ्या विषयाबाबत काहीना काही पोस्ट करत असतात.

अभिनेत्री आणि अभिनेते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसोबत कनेक्ट प्रयत्न करत असतात. ते आपल्या वैयक्तीक आयुष्यातील घडामोडीही शेअर करत असतात. तर कधी इंस्टग्राम या सोशल मीडियावर प्लॅटफोर्मवरून लाईव्ह येऊन चाहत्यांसोबत संवाद साधतात.

अशातच बॉलिवूड अभिनेता सोनू सूद यानं एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यानं एक जबरदस्त स्टंट केला आहे. आपल्याला माहित आहे की, कोणत्याही प्रकारचा स्टंट करणं हे खूप अवघड असते. त्याच्यासाठी तुम्हाला दररोज मेहनत आणि प्रॅक्टिस करावी लागते. तेव्हा कुठं आपल्याला स्टंट करता येतो.

तसेच स्टंट करण्यासाठी आपलं शरिर सुदृढ असणं फार महत्वाचं असतं. त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या संपूर्ण शरिराचा पेलवता आला पाहिजे.

शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सोनू सूद खाली डोक वर पाय अशा अवस्थेत असल्याचं दिसत आहे. त्यानं आपल्या संपूर्ण शरिराचा भार आपल्या दोन हातांवर घेतला असून, दोन्ही हातांमध्ये त्यानं डंबेल्स धरले आहेत. त्याला या पोझिशनमध्ये पाहून त्याच्यामध्ये खूप स्टॅमिना असल्याचं समजतं आहे.

सोनूने हा व्हिडीओ त्याच्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्यानं एक कॅप्शनही लिहिलं आहे. त्यामध्ये त्यानं हा स्टंट खूप खतरनाक असून, हा स्टंट करू नका. व्यवस्थित मार्गदर्शन घेतल्यावरच करा, असं त्यांनं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

मजेशीर बाब म्हणजे व्हिडीओच्या शेवटी सोनू सूद उठून बसतो. त्यावेळी समजतं की, तो आपल्या दोन्ही हातांवर उभा नसून, म्हणजेच खाली डोक वर नसून तो खाली जमिनीवर आपल्या पाठीवर झोपला होता. व्हिडीओ काढणाऱ्यानं तो वेगळ्या अॅंगलनं काढल्यामुळं व्हिडीओ पाहणाऱ्यांचा घोळ झाला असल्याचं समजतं आहे.

https://twitter.com/SonuSood/status/1434019946132951043

महत्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! सिद्धार्थ शुक्ला प्रकरणी पोलिसांनी दाखल केला गुन्हा

पाण्यात उडी मारायला गेला अन्…, पाहा काळजाचं पाणी करणारा व्हिडीओ

‘सिद्धार्थचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे होऊ शकत नाही’, सिद्धार्थच्या जिम ट्रेनरचा खळबळजनक दावा

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचा पोस्टमार्टम रिपोर्ट अखेर पोलिसांच्या हाती, जाणून घ्या काय आहे मृत्यूच कारण

अभिनेता सिद्धार्थ शुक्लावर आज होणार अंत्यसंस्कार