एका चिमुरड्यानं केलं जयंत पाटलांचं फोटोशूट आणि पाटील म्हणाले…

सांगली | राष्ट्रवादी नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील नेहमीच लोकांच्यात जाऊन काम करताना दिसतात. जयंत पाटील यांच्या लोकांच्यात मिसळून काम करण्याच्या याच स्वभावामुळे लोक देखील त्यांना भरभरून प्रेम देतात. अशातच आता जयंत पाटील यांचा एका चिमुरड्या बरोबरचा फोटो व्हायरल होत आहे.

जयंत पाटील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील नवेखेड येथे आज दौर्‍यावर होते. त्यावेळी एका चिमुरड्याने जयंत पाटील यांना मला तुमचा फोटो काढायचाय, असं म्हटलं. यावेळी पाटील यांनी देखील लगेच त्या चिमुरड्याला पोज दिली. यानंतर त्याला निट काढलास ना रे फोटो, असं म्हणत शाबासकी देखील दिली.

रुद्र सागर जंगम असं या लहानग्याचं नाव आहे. रुद्र अवघ्या 6 वर्षाचा आहे. यावेळी रुद्र जंगम यानं त्याच्या तोंडपाठ असलेल्या सर्व मंगलाष्टकाही जयंत पाटील यांना म्हणून दाखवल्या.

रुद्रने जयंत पाटील यांचा काढलेला हा फोटो सांगली जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. सांगली जिल्ह्यातील लोक या लहानग्याचं भरभरून कौतुक करत आहेत.

दरम्यान, राजकीय वर्तुळाबद्दल बोलायचं झालं तर येत्या काळात राष्ट्रवादीत मेगा भरती होणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. मुंबईत एका वृत्त माध्यमाशी बोलताना त्यांनी हे संकेत दिले होते.

यावेळी जयंत पाटील म्हणाले होते की, गेले काही दिवस अनेक सदस्य चर्चा करत आहेत. भाजपचे हाताच्या दोन्ही बोटांपेक्षा अधिक सदस्य नाराज आहेत. उबग आलेली आहे. त्यांच्यातील बऱ्याच जणांचा राष्ट्रवादीकडे येण्याचा कल आहे.

याबद्दल लवकरंच निर्णय घेतला जाईल. राष्ट्रवादीत येत्या काळात लवकरंच मेगा भरती होण्याची शक्यता आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलं होतं. जयंत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर राजकरणात एकंच खळबळ उडाली होती.

जयंत पाटील यांच्यानंतर राष्टवादी नेते छगन भुजबळ यांनी देखील भाजपचे आमदार राष्ट्रवादीत येणार असल्याचं म्हटलं होतं. भाजपमधील 70 टक्के आमदार आमचेच आहेत. लवकरंच त्यांच्या पक्ष प्रवेशाच्या मुद्द्यावर शरद पवार विचार करतील, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या-

‘धर्म बदल नाहीतर…’; दिवंगत गायक वाजिद खानच्या पत्नीचे वाजिदवर गंभीर आरोप!

भाजप आमदार गणेश नाईक राष्ट्रवादीत परतणार? गणेश नाईक म्हणाले…

तुम्हालाही कोरोनावरील लस घ्यायची आहे का? जाणून घ्या कसं करायचं लसीसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन?

सोनिया गांधींनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिताच भाजप नेत्यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल!

अंकिता आणि सुशांतचा ब्रेकअप का झाला होता? अंकितानं केला मोठा खुलासा!