Agriculture Budget 2024 | अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय? दुग्धोत्पादकांपासून मिळालं बरचं काही

Agriculture Budget 2024 | अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सहावा अर्थसंकल्प सादर केला आहे. संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी कृषी क्षेत्रासाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशात दूध आणि दुग्धजन्य पदार्थ वाढवण्याच्या योजनेची घोषणा केली आहे.

अर्थमंत्र्यांनी सांगितले की, भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे, परंतु उत्पादकता कमी आहे. दुग्धोत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी योजना आणली जाईल. 2022-23 मध्ये भारताचे दूध उत्पादन 4 टक्क्यांनी वाढून 230.5 दशलक्ष टन झाले आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे परंतु दुभत्या जनावरांची उत्पादकता कमी आहे. राष्ट्रीय गोकुळ मिशन, राष्ट्रीय पशुधन अभियान आणि डेअरी प्रक्रिया आणि पशुसंवर्धनासाठी पायाभूत सुविधा विकास निधी यासारख्या विद्यमान योजनांच्या यशावर आधारित असणार आहे.

Agriculture Budget 2024 | NANO DAP च्या वापराला प्रोत्साहन :

यासह नॅनो युरियाचा वापर कृषी-हवामान असलेल्या भागातील विविध पिकांमध्ये केला जाणार आहे. नॅनो युरियाच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर विविध पिकांवर फवारणीसाठी नॅनो डीएपीचाही विस्तार केला जाणार आहे. याद्वारे देशातील 1361 मंडई ई-नामशी जोडल्या जातील.

मोहरी व भुईमूग लागवड वाढवण्यावर भर :

तेलबिया क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी धोरण तयार केले जाणार आहे. तेलबिया उत्पादनासाठी स्वावलंबी होण्यासाठी धोरण आखले जाईल असेही अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या आहेत. तसेच कृषी क्षेत्रात मूल्यवर्धित करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न अधिक तीव्र केले जातील व सरकार मोहरी आणि भुईमूग शेतीला आणखी प्रोत्साहन देईल.

Agriculture Budget 2024 | सरकार 5 एकात्मिक एक्वा पार्क उघडणार :

अंतरिम अर्थसंकल्पात मत्स्यसंपत्ती अंतर्गत जलसंपत्ती दुप्पट केली जाईल असे अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजने अंतर्गत सरकार 5 एकात्मिक एक्वा पार्क उघडणार आहे. मत्स्यपालन उत्पादन प्रति हेक्टर 3 टनांवरून 5 टनांपर्यंत वाढेल. यासोबतच निर्यात दुप्पट करून एक लाख रुपये करण्यावर भर देण्यात आला होता. अर्थमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, यामुळे आगामी काळात 55 लाख रोजगार निर्माण होतील. (Agriculture Budget 2024)

सरकार खाजगी-सार्वजनिक गुंतवणुकीला आणखी प्रोत्साहन देणार (Agriculture Budget 2024) :

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि कृषी क्षेत्रात मूल्यवर्धन करण्यासाठी प्रधानमंत्री किसान संपदा योजनेचा 38 लाख शेतकऱ्यांना लाभ झाला असून 10 लाख नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्रायझेस योजनेचे प्रधानमंत्री औपचारिकीकरण योजनेंतर्गत 2.4 लाख बचत गट आणि 60 हजार व्यक्तींना क्रेडिट जोडले गेले आहे. तसेच काढणीनंतरचे नुकसान कमी करण्यासाठी आणि उत्पादकता आणि उत्पन्न वाढवण्यासाठी इतर योजना लागू करण्यात आल्या आहेत.

News Title : Agriculture Budget 2024

महत्वाच्या बातम्या – 

Why budget briefcase is red l अर्थसंकल्प लाल कापड किंवा लाल सूटकेसमध्ये का आणला जातो? जाणून घ्या यामागचे कारण

Budget 2024 LIVE l अर्थसंकल्प कसा तयार केला जातो? थेट प्रक्षेपण कधी आणि कुठे पाहाल?

Ramayan l ‘रामायण’ मालिका पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला! या वाहिनीवर पाहता येणार

RBI Paytm Bank l Paytm बंद झाल्यानंतर अकाऊंटमधील पैशांचं काय होणार?

Today Horoscope lआजचे राशिभविष्य! या राशीच्या व्यक्तींनी प्रवास करणे टाळावा