विराट-अनुष्काच्या दोन्ही मुलांच्या नावांशी आहे खास कनेक्शन

Anushka Sharma Welcomed Baby Boy l बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा आई झाली आहे. तिने एका मुलाला जन्म दिला आहे. अनुष्काने यासंदर्भात सोशल मीडियावर माहिती दिली आहे. तसेच अनुष्काने सोशल मीडियावर पोस्ट करताना आपल्या नवजात मुलाचे नाव देखील जाहीर केले आहे. मात्र या दोन्ही मुलांच्या नावांचाही या जोडप्याशी विशेष संबंध आहे.

Anushka Sharma Welcomed Baby Boy l अकाय या नावाशी विशेष कनेक्शन काय आहे? :

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे डिसेंबर 2017 मध्ये लग्न झाले. जानेवारी 2021 मध्ये त्यांना पहिली मुलगी झाली. या जोडप्याने आपल्या मुलीचे नाव वामिका ठेवले आहे. आता तब्बल 3 वर्षांनंतर विराट आणि अनुष्का दुसऱ्यांदा पालक बनले आहेत. या जोडप्याने अलीकडेच एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. (Anushka Sharma Baby Boy)

विराट आणि अनुष्काने त्यांच्या मुलाचे नाव अकाय ठेवले आहे. कनेक्शनबद्दल बोलायचे झाले तर विराट कोहलीचे नाव V ने सुरु होते आणि वामिकाचे नाव देखील V अक्षराने सुरु होते. दुस-या मुलासोबतही असेच झाले आहे. अनुष्काच्या नावाची सुरुवात A ने होते आणि मुलाचे नाव Akay देखील A ने आहे.

Anushka Sharma Welcomed Baby Boy l पोस्ट शेअर करून दिली माहिती :

इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करताना विराट कोहली आणि अनुष्का शर्माने (Anushka Sharma Baby Boy) लिहिले की, मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने आम्ही हे शेअर करू इच्छितो की 15 फेब्रुवारी 2024 रोजी आम्ही या जगात लहान मुलाचे अकाय आणि वामिकाच्या धाकट्या भावाचे स्वागत केले आहे. याप्रसंगी आम्ही तुमचे अभिनंदन आणि आशीर्वाद इच्छितो आणि तुम्हाला विनंती करतो की या काळात आमच्या गोपनीयतेची पूर्ण काळजी घ्या.

एबी डिव्हिलियर्सने दिले होते संकेत :

यूट्यूब लाईव्हमध्ये एबी डिव्हिलियर्स म्हणाले होते, ‘होय, त्याचे दुसरे अपत्य येणार आहे. तसेच हा कुटुंबाचा वेळ आहे आणि गोष्टी त्यांच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. मात्र नंतर डिव्हिलियर्सने आपले वक्तव्य मागे घेत लाइव्ह व्हिडिओमध्ये चुकीची माहिती दिल्याचे सांगितले होते.

News Title : Anushka Sharma Welcomed Baby Boy

महत्वाच्या बातम्या –

आजचे राशिभविष्य! या राशीच्या व्यक्तीने गुंतवणूक करताना सावध राहावे

भारताला मोठा धक्का! हा दिग्गज खेळाडू चौथ्या कसोटीतून माघार घेणार

चेहऱ्यावरचे ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी हे घरगुती उपाय करा!

LIC च्या 243 रुपयांच्या प्रीमियमवर मिळवा तब्बल 54 लाख रुपये; जाणून घ्या सर्व माहिती

शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! कांद्याचे दर कडाडले