LIC च्या 243 रुपयांच्या प्रीमियमवर मिळवा तब्बल 54 लाख रुपये; जाणून घ्या सर्व माहिती

LIC Jeevan Labh l देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC म्हणजेच भारतीय आयुर्विमा मंडळाद्वारे अनेक विमा योजना चालवल्या जातात, ज्यामध्ये लोकांना विम्यासोबत गुंतवणूक करण्याची संधी मिळते. अशीच एक योजना म्हणजे LIC जीवन लाभ. LIC च्या जीवन लाभ योजनेद्वारे पॉलिसीधारकांना बचतीसोबत विम्याचे संरक्षण देखील मिळते.

LIC Jeevan Labh l LIC जीवन लाभ म्हणजे काय? :

LIC जीवन लाभ ही एकप्रकारे मर्यादित प्रीमियम पे, नॉन-लिंक्ड, नफ्यासह एंडोमेंट योजना आहे. यामध्ये बचतीसोबतच सुरक्षेचाही लाभ मिळतो. महत्वाची बाब म्हणजे पॉलिसीधारक व्यक्तीचा योजनेच्या मुदतीदरम्यान अचानक मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला कंपनीकडून एकरकमी रक्कम दिली जाते. यासोबतच कर्जाची सुविधा देखील दिली जाते.

एलआयसी जीवन लाभचे योजनेचे फायदे! :

LIC जीवन लाभ योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे मृत्यू लाभ. प्लॅनच्या मुदतीदरम्यान पॉलिसी धारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या अवलंबितांना वार्षिक प्रीमियमच्या 10 पट रक्कम दिली जाते आणि मृत्यूचा लाभ आतापर्यंत भरलेल्या प्रीमियमच्या 105 टक्क्यांपेक्षा कमी असू शकत नाही. तसेच यासाठी पॉलिसी प्रीमियम वेळेवर भरणे आवश्यक आहे.

तसेच जर पॉलिसीधारक मॅच्युरिटीपर्यंत जिवंत असल्यास तर त्याला मूळ विम्याच्या रकमेबरोबरच बोनस किंवा अतिरिक्त बोनसचा देखील लाभ मिळतो. हे सर्व पॉलिसीधारकाला मुदतपूर्तीच्या वेळी एकरकमी दिले जाते.

LIC Jeevan Labh l तुम्ही 2 लाख रुपयांच्या विमा रकमेपासून सुरुवात करू शकता! :

या योजनेचा लाभ आठ वर्षे ते 59 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती घेऊ शकता. तसेच पॉलिसी घेण्यासाठी किमान 2 लाख रुपयांची विमा रक्कम घ्यावी लागते. तसेच वेळ आणि प्रीमियम पेमेंटच्या आधारावर तीन भागांमध्ये विभागले गेले आहे. पहिला – (16/10), दुसरा – (21/15) आणि तिसरा – (25/16). तसेच यामध्ये मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक प्रीमियमचा पर्याय उपल्बध असणार आहे.

54 लाखांचा फायदा कसा मिळणार? :

जर एखाद्या 25 वर्षीय व्यक्तीने 20 लाख रुपयांच्या विमा रकमेसह 25 वर्षांच्या मुदत असलेली योजना निवसली तर त्याला 16 वर्षांसाठी वार्षिक 88,910 रुपये किंवा अंदाजे 243 रुपये प्रतिदिन प्रीमियम भरावा लागेल. अशाप्रकारे वयाच्या 50 व्या वर्षी, त्याला 54.00 लाख रुपयांपर्यंतचा लाभ मिळेल.

News Title : LIC Jeevan Labh Scheme

महत्वाच्या बातम्या :

शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! कांद्याचे दर कडाडले

पुणेकरांनो! रात्री हॉटेलमध्ये जाण्यापूर्वी पोलिसांची नवी नियमावली एकदा वाचाच

विशेष अधिवेशनात मराठा समाजाला ‘इतके’ टक्के आरक्षण मिळणार!

आजचे राशिभविष्य! या राशीच्या व्यक्तींना व्यापारातून चांगला लाभ होईल

लवकरच बाजारात येणार या दोन कार; पाहा फीचर्स आणि इतर माहिती