चेहऱ्यावरचे ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी हे घरगुती उपाय करा!

Blackheads Removal l आजकाल तरुणांमध्ये ब्लॅकहेड्सची समस्या जास्त प्रमाणात उद्भवते. यामुळे त्वचा निस्तेज दिसू लागते आणि चेहऱ्याचे सौंदर्य कमी होते. वास्तविक, नाक आणि हनुवटीवर ब्लॅकहेड्स असतात. ते काढून टाकण्यासाठी लोक अनेक प्रॉडक्ट वापरतात, परंतु ते इतके प्रभावी नसतात. अशा परिस्थितीत तुम्ही घरच्या घरी ब्लॅकहेड्स कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय करू शकता. जे तुम्हाला तुमचे ब्लॅकहेड्स दूर करण्यात मदत करू शकतात.

Blackheads Removal l बेकिंग सोडा :

बेकिंग सोड्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म आढळतात. बेकिंग सोडा मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास जास्त मदत करतात. हे करण्यासाठी 1 टेबलस्पून बेकिंग सोडा 2 टेबलस्पून पाण्यात मिसळा. ब्लॅकहेड्स असलेल्या भागावर लावा. त्यानंतर 10 ते 15 मिनिटांनंतर चेहरा पाण्याने स्वच्छ करा असे केल्याने चेकऱ्यावरील ब्लॅकहेड्स कमी होण्यास मदत होते.

स्क्रब (Blackheads Removal) :

एक्सफोलिएटिंग स्क्रब त्वचेवरील सर्व ब्लॅकहेड्स आणि मृत त्वचेच्या पेशींपासून मुक्त होऊन त्वचा मऊ बनवते. हे करण्यासाठी 1 चमचा ग्राउंड कॉफीमध्ये 1 चमचा खोबरेल तेल आणि अर्ध्या लिंबाचा रस मिसळा. त्यानंतर हलक्या हातांनी चेहऱ्याला मसाज करा. विशेषतः जेथे ब्लॅकहेड्स असतात. त्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.

Blackheads Removal l मध आणि लिंबू :

2 चमचे लिंबाच्या रसामध्ये अर्धा चमचा साखर आणि अर्धा चमचा मध मिसळा. त्यानंतर हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि साधारण 2 मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. जर तुमची त्वचा कोरडी वाटत असेल तर मॉइश्चरायझर लावा. महत्वाचं म्हणजे ते डोळे आणि तोंडाभोवती लावणे टाळा.

टोमॅटो आणि लिंबू :

एका भांड्यात अर्धा टोमॅटो घ्या आणि त्यामध्ये अर्धे लिंबू पिळून चांगले मिसळा. नंतर कॉटन पॅड वापरून चेहऱ्यावर लावा आणि 10 ते 15 मिनिटे ठेवल्यानंतर थंड पाण्याने धुवा आणि रुमालाच्या मदतीने चेहरा कोरडा करा. असे केल्याने चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स निघून जातील. (Blackheads Removal)

News Title : Natural Remedies For Quick Blackhead Removal

महत्वाच्या बातम्या :

LIC च्या 243 रुपयांच्या प्रीमियमवर मिळवा तब्बल 54 लाख रुपये; जाणून घ्या सर्व माहिती

शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! कांद्याचे दर कडाडले

पुणेकरांनो! रात्री हॉटेलमध्ये जाण्यापूर्वी पोलिसांची नवी नियमावली एकदा वाचाच

विशेष अधिवेशनात मराठा समाजाला ‘इतके’ टक्के आरक्षण मिळणार!

आजचे राशिभविष्य! या राशीच्या व्यक्तींना व्यापारातून चांगला लाभ होईल