Ind Vs Eng l 23 फेब्रुवारीपासून रांची येथे भारत विरुद्ध इंग्लंड या दोन संघांमध्ये कसोटी मालिकेतील चौथा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 3 कसोटीत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. या आघाडीमुळे रांची कसोटीत खेळणाऱ्या टीम इंडियात मोठा बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराहला रांची कसोटीत विश्रांती दिली जाऊ शकते अशी माहिती समोर आली आहे.
बुमराह हा संघाचा वरिष्ठ खेळाडू आहे. बुमराह हा सध्याच्या मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. बुमराहने आतापर्यंत खेळलेल्या 3 सामन्यात 17 विकेट घेतल्या आहेत. पण कामाचा बोजा सांभाळायचा असेल तर विश्रांती द्यावी लागेल. आणि असे झाले तर रांची कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याच्या जागी कोण येणार? याची आतुरता प्रेक्षकांना लागली आहे.
Ind Vs Eng l बुमराह रांचीत खेळला नाही तर हे चार पर्याय असतील! :
टीम इंडियाकडे असे 4 खेळाडू आहेत पर्याय ते प्लेइंग इलेव्हनमध्ये बुमराहची जागा घेऊ शकतील. यामध्ये मुकेश कुमार, आकाशदीप, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल या खेळाडूंचा समावेश आहे. मात्र आता या चारपैकी कोणाला संधी द्यायची हे संघ व्यवस्थापनावर अवलंबून असणार आहे.
Ind Vs Eng l चारही खेळाडूंबद्दलची थोडक्यात माहिती :
मुकेश कुमारबद्दल बोलायचे झाले तर, विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीनंतर त्याला संघातून बाहेर थांबवण्यात आले. मात्र मुकेशला रणजी खेळण्यासाठी पाठवण्यात आले. कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या बिहार विरुद्धच्या रणजी सामन्यात मुकेश कुमारने बंगालकडून एकहाती 10 बळी घेतले. त्याने पहिल्या डावात 4 तर दुसऱ्या डावात 6 बळी घेतले होते.
आकाशदीप पहिल्यांदाच टीम इंडियाचा भाग बनला आहे. तो बंगालकडून प्रथम श्रेणी क्रिकेटही खेळतो. या 27 वर्षीय खेळाडूने आतापर्यंत 30 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 23.58 च्या सरासरीने 104 बळी घेतले आहेत. आकाशदीपला संधी मिळाल्यास इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पदार्पण करणारा तो तिसरा भारतीय खेळाडू ठरेल.
याशिवाय संघ व्यवस्थापन वेगवान गोलंदाज बाजूला ठेऊन बुमराहच्या जागी दुसरा फिरकीपटू मैदानात उतरवण्याचा विचार देखील करू शकतो. जर असे झाल्यास वॉशिंग्टन सुंदर किंवा अक्षर पटेल यापैकी एकाची निवड होऊ शकते.
News Title : ind vs eng jasprit bumrah is rested
महत्वाच्या बातम्या –
चेहऱ्यावरचे ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी हे घरगुती उपाय करा!
LIC च्या 243 रुपयांच्या प्रीमियमवर मिळवा तब्बल 54 लाख रुपये; जाणून घ्या सर्व माहिती
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! कांद्याचे दर कडाडले
पुणेकरांनो! रात्री हॉटेलमध्ये जाण्यापूर्वी पोलिसांची नवी नियमावली एकदा वाचाच
विशेष अधिवेशनात मराठा समाजाला ‘इतके’ टक्के आरक्षण मिळणार!