BCCI ने जाहीर केला वार्षिक करार! या चार खेळाडूंना मिळणार तब्बल 7 कोटी रुपये

BCCI Central Contract l टीम इंडियाच्या दमदार कामगिरीनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एक मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआयने या वर्षासाठी खेळाडूंचा केंद्रीय करार जाहीर केला असून त्यात काही मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. BCCI ने वार्षिक कराराची घोषणा केली आहे. या करारानंतर श्रेयस अय्यर (Shreyas Ayar ) आणि इशान किशनच्या (Ishan Kishan) चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. BCCI ने जाहीर केलेल्या करारामध्ये श्रेयस अय्यर आणि इशान किशनचे नाव वगळण्यात आले आहे.

BCCI Central Contract l श्रेयस अय्यर आणि इशान किशनचा पत्ता कट :

श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांनी रणजी ट्रॉफी न खेळल्यामुळे या दोन खेळाडूंची नवे वार्षिक करारामधून वगळण्यात आली आहेत. तसेच या करारामध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या युवा फलंदाज यशस्वी जैस्वालला पहिल्यांदाच करार मिळाला आहे.

BCCI आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना दरवर्षी 12 महिन्यांचा करार देत असते. या अंतर्गत खेळाडूंना ठराविक रक्कम दिली जाते. पण कि रक्कम किती असते हे तुम्हाला माहित आहे का? तसेच BCCI ने वार्षिक करारामध्ये कोणत्या खेळाडूंचा कोणत्या श्रेणीमध्ये समावेश केला आहे हे जाणून घेऊयात…

BCCI कडून वार्षिक करार जाहीर!

A+ ग्रेड : रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा
A ग्रेड : आर अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, लोकेश राहुल, शुभमन गिल आणि हार्दिक पांड्या
B ग्रेड : सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि यशस्वी जैस्वाल.
C ग्रेड : रिंकू सिंग, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, शिवम दुबे, रवी बिश्नोई, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, केएस भरत, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि रजत पाटीदार.

BCCI Central Contract l ग्रेडनुसार किती रक्कम मिळते?

A+ ग्रेड : 7 कोटी रुपये
A ग्रेड : 5 कोटी रुपये
B ग्रेड : 3 कोटी रुपये
C ग्रेड : 1 कोटी रुपये

News Title : BCCI Central Contract 2024  

महत्त्वाच्या बातम्या – 

आजचे राशिभविष्य! गुंतवणुकीशी संबंधित बाबींना गती मिळेल

महाशिवरात्रीचे व्रत या पद्धतीने साजरे करा; होईल मनोकामना पूर्ण

…या कारणामुळे मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन केले स्थगित

तुम्हाला माहितीये का? भारतात अजूनही किती लोक इंटरनेट वापरत नाहीत? आकडेवारी वाचून थक्क व्हाल

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आज ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे होणार जमा