Deepika Padukone Pregnant l बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग आई-वडील होणार असल्याची बातमी गेल्या अनेक दिवसांपासून सर्वत्र येत आहे. आता या बातम्यांवर दीपिका आणि रणवीरने घरी नवीन पाहून येणार असल्याची माहिती दिली आहे. बॉलिवूडच्या प्रसिद्ध जोडप्याने त्यांच्या आगामी मुलाची माहिती सर्वांसोबत शेअर केली आहे. या घोषणेनंतर दीपिका आणि रणवीरच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेना.
Deepika Padukone Pregnant l दीपिका तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार :
दीपिकाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून सर्वांना ही आनंदाची बातमी दिली आहे. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे, जी सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे. पोस्टमध्ये जोडप्याने सप्टेंबर महिन्याचा उल्लेख केला आहे. म्हणजेच सप्टेंबर 2024 मध्ये दीपिका तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे.
या पोस्टनंतर बॉलिवूड स्टार्सपासून ते दीपिका-रणवीरच्या चाहत्यांपर्यंत सर्वांनी त्यांचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या आयुष्यातील या नव्या टप्प्यासाठी या जोडप्याचे चाहते त्यांचे अभिनंदन करत आहेत. दीपिका पदुकोण लवकरच गुड न्यूज देणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून केली जात होती. आता या बातम्यांवर शिक्कामोर्तब केल्यानंतर अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना खूश केले आहे. दीपिका पदुकोणचे सध्या अनेक प्रोजेक्ट प्रदर्शित होपणार आहेत. सिंघम अगेनमध्ये दीपिका पदुकोण कॅमिओ करणार आहे.
Deepika Padukone Pregnant l दीपिका बेबी बंप लपवताना दिसली होती :
गेल्या कित्येक दिवसांपासून अभिनेत्री दीपिका पदुकोण गरोदर असल्याची चर्चा होती. बाफ्टा अवॉर्ड्स 2024 मध्ये देखील दीपिका पदुकोणने हजेरी लावली होती, त्या अवॉर्ड्स सोहळ्यात दीपिकाने साडी घातली होती. त्यावेळी ती बेबी बंप लपवताना दिसून आली होती.
News Title : Deepika Padukone-Ranveer Singh confirm pregnancy
महत्त्वाच्या बातम्या –
BCCI ने जाहीर केला वार्षिक करार! या चार खेळाडूंना मिळणार तब्बल 7 कोटी रुपये
आजचे राशिभविष्य! गुंतवणुकीशी संबंधित बाबींना गती मिळेल
महाशिवरात्रीचे व्रत या पद्धतीने साजरे करा; होईल मनोकामना पूर्ण
…या कारणामुळे मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन केले स्थगित
तुम्हाला माहितीये का? भारतात अजूनही किती लोक इंटरनेट वापरत नाहीत? आकडेवारी वाचून थक्क व्हाल