Bigg Boss 17 l बिग बॉस 17 या रिअॅलिटी शो ची सर्वांनाच उत्सुकता आहे. आता हा रिअॅलिटी शो अंतिम टप्प्यात आला आहे. नुकतंच या शोमधून अंकीता लोखंडेचा पती विकी जैनने घराचा निरोप घेतला आहे. अशातच बिग बॉस 17 ला टॉप 5 स्पर्धक मिळाले आहेत. त्यामुळे आता बिग बॉस 17 च्या ग्रँड फिनालेची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.
बिग बॉस 17 या शोला मिळाले टॉप 5 फायनलिस्ट! :
तीन महिने चाललेल्या या शोला टॉप 5 फायनलिस्ट मिळाले आहेत. मुंबईची अंकिता लोखंडे, डोंगरीचा मुनावर फारुकी, दिल्लीचा मन्नारा चोप्रा, पंजाबचा अभिषेक कुमार आणि हैदराबादचा अरुण महाशेट्टी यांच्यापैकी कोण ट्रॉफी जिंकणार हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांना खूप उत्सुकता आहे. विजेता घोषित करण्यापूर्वी बिग बॉसच्या मंचावर सलमान खानसोबत 6 तासांचे सेलिब्रेशन होणार आहे.
Bigg Boss 17 l ‘बिग बॉस 17 ग्रँड फिनाले’ कधी, कुठे आणि कसा पाहायचा :
‘बिग बॉस 17’ चा ग्रँड फिनाले एपिसोड रविवार, 28 जानेवारी रोजी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होणार आहे. बिग बॉसच्या 17 व्या सीझनच्या विजेत्यांची घोषणा रात्री बारा वाजण्याच्या सुमारास होणार आहे. प्रेक्षकांना हा ग्रँड फिनाले एपिसोड ‘कलर्स टीव्ही चॅनल’ किंवा OTT वर ‘Jio Cinema’ या अॅपवर पाहता येईल.
Bigg Boss 17 l विजेत्याला काय मिळणार? :
विजेत्याला ट्रॉफीसोबतच 50 लाख रुपयांची बक्षीस रक्कम आणि कार मिळणार आहे. परंतु अनेक वेळा शेवटच्या दिवशी झालेल्या कामांमध्ये ही रक्कम कमी होते. बिग बॉसची इच्छा असेल तर सीझन 17 मध्येही ‘सूटकेस’चा ट्विस्ट असू शकतो. ज्यामध्ये टॉप 5 स्पर्धकांपैकी एकाला विजेत्याचे बक्षीस म्हणून 10 लाख रुपये ऑफर केले जातील आणि हे पैसे घेतल्यानंतर त्याला शो सोडावा लागेल. असे झाल्यास विजेत्याला मिळणाऱ्या रकमेतून 10 लाख रुपये कमी होतील. याशिवाय शोच्या प्रायोजकांकडून त्यांना अनेक बक्षिसेही दिली जातील.
News Title : Bigg Boss 17 finale
महत्वाच्या बातम्या :
Jobs are not at risk from AI l दिलासादायक बातमी! तुमची नोकरी AI पासून धोक्यात नाही; संशोधनात समोर
Virat Kohli Replacement l कसोटी मालिकेत विराट कोहलीच्या जागी ‘या’ खेळाडूची एंट्री!
Today Horoscope l या राशीसाठी आजचा दिवस महत्वाचा; तडकाफडकी कामे करू नका अन्यथा…