Test Team Of The Year 2023 l ICC ने 2023 चा सर्वोत्कृष्ट कसोटी संघ केला जाहीर केला; भारताच्या या खेळाडूंना मिळाले स्थान

Test Team Of The Year 2023 l 2023 मधील सर्वोत्कृष्ट T20 संघ निवडल्यानंतर, ICC ने आता सर्वोत्कृष्ट ODI संघ देखील जाहीर केला आहे. या संघात एकूण 6 भारतीय प्लेअर्सला स्थान मिळाले आहे. यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माची निवड झाली असून या प्लेइंग इलेव्हनमध्ये विराट कोहली, शुभमन गिल यांचाही समावेश आहे. याशिवाय ऑस्ट्रेलिया संघातील केवळ 2 खेळाडूंची सर्वोत्तम वनडे संघात निवड झाली आहे.

ICC च्या वर्षातील सर्वोत्कृष्ट वनडे संघाचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल आहेत. ट्रॅव्हिस हेड हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर विराट कोहलीची चौथ्या क्रमांकावर निवड झाली आहे. न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू डॅरेल मिशेलचीही या संघात (Test Team Of The Year 2023) निवड झाली आहे. दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक हेनरिक क्लासेन यष्टीरक्षक म्हणून संघात आला आहे. दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज अष्टपैलू मार्को जॉन्सनही या संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. या संघात दोन फिरकीपटूंची निवड करण्यात आली आहे. (Test Team Of The Year 2023)

 2024 चा सर्वोत्कृष्ट एकदिवसीय संघ : 

रोहित शर्मा, शुभमन गिल, ट्रॅव्हिस हेड, विराट कोहली, डॅरेल मिशेल, हेनरिक क्लासेन, मार्को जॅनसेन, अॅडम झम्पा, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि मोहम्मद शमी.

Test Team Of The Year 2023 l आयसीसीने आकडेवारीच्या आधारे संघ निवडला :

– रोहित शर्माने 2023 मध्ये 52 च्या सरासरीने 1255 धावा केल्या होत्या आणि त्याने विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तान विरुद्ध 131 धावा केल्या होत्या.
– शुभमन गिलने 2023 मध्ये पाच शतके झळकावली आणि न्यूझीलंडविरुद्ध त्याने शानदार द्विशतकही झळकावले आहे.
– ट्रॅव्हिस हेडने 2023 च्या विश्वचषकात चमकदार कामगिरी करत आपल्या संघाला विश्वविजेते बनवले. व विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत आणि अंतिम फेरीत तो सामनावीर ठरला.
– विराट कोहलीने 2023 मध्ये 1377 धावा केल्या होत्या. त्याने एकूण 6 शतके झळकावली आणि विश्वचषकात तो प्लेअर ऑफ द टूर्नामेंटही ठरला.
– डॅरेल मिशेलने 2023 मध्ये पाच शतके झळकावली आणि 52.34 च्या सरासरीने त्याच्या बॅटने 1204 धावा केल्या.
– हेनरिक क्लासेनने 2023 मध्ये दोन एकदिवसीय शतके झळकावली आणि त्याने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध शतकी खेळी खेळली. तसेच यष्टिरक्षक म्हणूनही त्याची कामगिरी अप्रतिम होती.
– मार्को जॅन्सन आणि अॅडम झाम्पा यांनी चेंडूवर आपली ताकद दाखवून दिली. यान्सनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला, तर झाम्पाने 2023 साली एकूण 38 विकेट घेतल्या.
– 2023 मध्ये मोहम्मद सिराजने 44 विकेट्स घेतल्या आणि कुलदीप यादवने 49 विकेट घेतल्या आणि वर्षातील एकदिवसीय संघात स्थान मिळवले. तर मोहम्मद शमीने विश्वचषकात चार वेळा पाच बळी घेत इतिहास रचला आहे.

News Title : Test Team Of The Year 2023 

महत्वाच्या बातम्या :

Today Horoscope l या राशीसाठी आजचा दिवस महत्वाचा; तडकाफडकी कामे करू नका अन्यथा…

Manoj Jarange Mumbai March l मराठा आरक्षण यात्रा पुण्यात धडकणार; पाहा कोणते रस्ते सुरु, कोणते बंद?

WPL 2024 l किक्रेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी! महिला प्रीमियर लीगचे वेळापत्रक जाहीर

Tata Motors l कित्येक लोकांचं स्वप्न असलेल्या Tata Punch EV कारची डिलिव्हरी सुरू; पाहा किंमत आणि फीचर्स

Pradhan Mantri Suryoday Yojana l या योजनेचा लाभ घ्या अन् वीज बिलापासून सुटका मिळवा!