Pune Traffic Changes l पुणेकरांनो, मराठा आरक्षण मोर्चामुळे वाघोली, खराडीमध्ये तुफान गर्दी! असा असेल पुढील मोर्चाचा मार्ग

Pune Traffic Changes l मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. अशातच मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात लाखो मराठा सैनिक मुंबईकडे निघालेल्या मोर्चात सामील झाले आहेत. या मोर्चाला बीडमधून सुरूवात झाली असून जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

मोर्चेकरी आता पुण्यात दाखल झाले आहेत. काल रात्री मोर्चेकरी पुण्यातील वाघोली, खरेदी, चंदननगर येथे मुक्कामी होते. अशातच आज सकाळी पुन्हा या मोर्चाला सुरवात झाली आहे. पुण्यातया मोर्चाची जय्यत तयारी केली आहे. हा मोर्चा आज दुपारी पिंपरी चिंचवड शहराच्या हद्दीत येणार आहेत. (Pune Traffic Changes) मात्र अशातच आता मनोज जरांगेंच्या पदयात्रेमुळे पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल देखील करण्यात आलेत.

Pune Traffic Changes l असा असेल पुढील पदयात्रेचा मार्ग :

1) स्व. राजीव गांधी पुल औंध पुणे
2) सांगवी फाटा
3) जगताप डेअरी
4) डांगे चौक
5) चापेकर चौक चिंचवडगाव
6) महावीर चौक चिंचवड स्टेशन
7) आकुर्डी खंडोबा माळ चौक
8) निगडी मधुकर पवळे उड्डाणपूल
9) भक्ती शक्ती चौक निगडी
10) देहूरोड
11) तळेगाव
12) वडगाव फाटा मावळ
13) कामशेत
14) लोणावळा मुक्काम

सकाळी 6 वाजल्यापासून मार्ग वाहतुकीसाठी बंद :

पुणेकरांनी एक बाब लक्षात घेतली पाहिजे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी सहा वाजल्यापासून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तसेच यावेळी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून असे सांगण्यात आले आहे की, नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. याशिवाय मराठा मोर्चा जात असताना येथे अवजड वाहने ही पूर्णपणे बंद असणार आहेत. तसेच मोर्चा जसजसा पुढं सरकेल तसतसे हे मार्ग वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात येणार आहेत.

Pune Traffic Changes l पर्यायी मार्ग :

मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावरून, तसेच कोल्हापूर, सातारा येथून नगरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने कात्रज खडी मशिन चौक, मंतरवाडी फाटा हडपसरमार्गे सोलापूर रोडने केडगाव चौफुला – न्हावरे- शिरूरमार्गे जाणार आहेत याची नागरिकांनी दक्षता घ्यावी.

तसेच वाघोली, लोणीकंदमार्गे नगरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने थेऊर फाटा (सोलापूर रोड) येथून केडगाव चौफुला न्हावरामार्गे शिरूर ते अहमदनगर जाणार. यासह पुणे शहरातून नगरकडे जाणारी सर्व वाहने खराडी बायपास येथून उजवीकडे वळण घेऊन मगरपट्टा चौक, पुढे सोलापूर रोडने यवत केडगाव चौफुला – न्हावरे -शिरूरमार्गे पुढे जातील.

News Title : Pune Traffic Changes

महत्वाच्या बातम्या :

Test Team Of The Year 2023 l ICC ने 2023 चा सर्वोत्कृष्ट कसोटी संघ केला जाहीर केला; भारताच्या या खेळाडूंना मिळाले स्थान

Today Horoscope l या राशीसाठी आजचा दिवस महत्वाचा; तडकाफडकी कामे करू नका अन्यथा…

Manoj Jarange Mumbai March l मराठा आरक्षण यात्रा पुण्यात धडकणार; पाहा कोणते रस्ते सुरु, कोणते बंद?

WPL 2024 l किक्रेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी! महिला प्रीमियर लीगचे वेळापत्रक जाहीर

Tata Motors l कित्येक लोकांचं स्वप्न असलेल्या Tata Punch EV कारची डिलिव्हरी सुरू; पाहा किंमत आणि फीचर्स