महाराष्ट्र Top news सांगली

भाजप हा नंबर एकचा पक्ष बनला आहे- चंद्रकांत पाटील

chandrakant patil 1
Photo Courtesy - Twitter / @ChDadaPatil

सांगली | राज्यात भाजप हा नंबर एकचा पक्ष बनला आहे, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

पेठनाका  येथे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या भारतीय जनता पक्षाचे विजयी उमेदवार संग्रामसिह देशमुख, राहुल महाडिक, सत्यजित देशमुख यांच्या सत्कारप्रसंगी चंद्रकांत पाटील बोलत होते.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख , भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव नाईक निशिकांत पाटील उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे.

शिवसेनेने मात्र मुख्यमंत्रीपदासाठी आपला पक्षच संपविला आहे. हे अजूनही त्यांच्या लक्षात येईना, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

राज्यात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणूकांत भाजपने 21 जागा जिंकल्यात. त्यामुळे भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष झाला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीला 17 जागा मिळाल्या तर शिवसेनेला केवळ 12 जागाच मिळाल्यात.

गावोगावी राष्ट्रवादीने शिवसेनेचा पाडाव सुरु केला आहे. तरीही ही गोष्ट शिवसेनेच्या लक्षात येत नाही. असो. हा त्यांचा प्रश्न आहे. यापुढे भाजप सर्व निवडणूका पक्ष चिन्हावरच लढवेल, अशी घोषणाही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली आहे.

दरम्यान, अटीतटीच्या झालेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत भल्याभल्यांचे मनसुबे धुळीस मिळवत भाजपने सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मिळवलेले यश कौतुकास्पद आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘आ देखें जरा किसमे कितना है दम’; नवाब मलिकांचं भाजपच्या ‘या’ नेत्याला ओपन चॅलेंज 

पुढचे दोन दिवस राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता! 

राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार का?; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य 

ट्विटरच्या सीईओपदी भारतीय वंशाचे पराग अग्रवाल! 

लॉकडाऊनबाबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या…