Board Exam Tips l या मार्गांनी बोर्ड परीक्षेचा ताण कमी करा आणि चांगले मार्क्स मिळवा

Board Exam Tips l अवघ्या काही दिवसांवर दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा येऊन ठेपल्या आहेत. यापार्श्वभूमीवर काल राज्य मंडळाने देखील पेपरला 10 मिनिटे वेळ वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र परीक्षेच्या काळात मुलांवर तणाव येत असतो. अशावेळी पालक देखील खचून जातात. मात्र पालकवर्गांनो तुमच्या मुलांच्या परीक्षांना अजून एक महिना (Board Exam Tips) असल्याने तुम्ही त्यांची आत्तापासूनच तयारी केली पाहिजे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी नेमकं काय केलं पाहिजे ते आज जाणून घेऊयात…

अभ्यासाची वेळ निश्चित करा :

बोर्डाच्या परीक्षांचा अभ्यासक्रम जास्त असल्याने अनेकदा विद्यार्थी घाबरतात. अशा परिस्थितीत प्रत्येक विषयाचे वेळापत्रक बनवणे गरजेचे आहे. तसेच बनवलेल्या वेळापत्रकानुसार प्रत्येक विषयाचा अभ्यास वेळेत पूर्ण करावा. याशिवाय परीक्षा सुरु होण्याच्या 2 दिवस आधी सर्व विषयांचा पुन्हा एकदा सर्व करावा. यामुळे पेपर लिहताना टेंशन येत नाही.

Board Exam Tips l आरोग्याकडे लक्ष द्या :

कोणत्याही परीक्षेची तयारी करण्यासाठी योग्य मानसिक स्थितीबरोबरच निरोगी असणे देखील महत्त्वाचे असते. जर तुम्ही चांगली विश्रांती घेत असाल, तसेच संतुलित आहार घेत असाल आणि नियमित व्यायाम करत असाल तर तुम्हाला उत्साही आणि प्रेरणा मिळेल. हे तुम्हाला चांगल्या प्रकारे एकाग्र होण्यास आणि परीक्षेची तयारी करण्यास मदत करेल. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या काळात या गोष्टींकडे बारकाईने लक्ष द्यावे. (Board Exam Tips)

कुटुंब आणि मित्रांना वेळ द्या :

परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना टेंशन येत असते. अशा तणावपूर्ण परिस्थितीत मित्र आणि कुटुंबीयांचा पाठिंबा असणे फार महत्त्वाचे असते. त्यामुळे भावनांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. मित्र आणि कुटुंब अशा वेळी मनोबल आणि आत्मविश्वास वाढवण्यास मदत करू शकतात आणि परीक्षेच्या तयारीमध्ये देखील मदत करू शकतात. याशिवाय तुमच्या मित्र, कुटुंब आणि अगदी तुमच्या (Board Exam Tips) शिक्षकांकडून मदत घेण्यास अजिबात संकोच करू नका.

Board Exam Tips l मॉक टेस्ट :

आगामी बोर्ड परीक्षांची तयारी करताना मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, इतर नमुना पेपर आणि मॉक टेस्ट सोडवा. प्रत्येक विषयांच्या 5 मॉक टेस्ट सोडवणे फार महत्वाचे असते. तसेच यामुळे पेपर सोडवणे देखील सोपे जाते.

News Title : Board Exam Tips 

महत्वाच्या बातम्या :

Today Horoscope l आजचे राशिभविष्य! आज या राशीच्या लोकांनी प्रवास करणे टाळावा

Benefits of drinking water l शरीरात पाण्याची कमतरता आहे की नाही? तुम्ही अशाप्रकारे तपासू शकता

Bigg Boss 17 l बिग बॉस 17 ला मिळाले टॉप 5 फायनलिस्ट! कधीआणि कुठे पाहता येईल फिनाले

Jobs are not at risk from AI l दिलासादायक बातमी! तुमची नोकरी AI पासून धोक्यात नाही; संशोधनात समोर

Virat Kohli Replacement l कसोटी मालिकेत विराट कोहलीच्या जागी ‘या’ खेळाडूची एंट्री!