या महिला क्रिकेटरने चक्क मुंबई इंडियन्सला चारली पराभवाची धूळ

Kiran Navgire WPL l महिला प्रीमियर लीग 2024 चा सहावा सामना मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात काल म्हणजेच 28 फेब्रुवारी रोजी बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला गेला आहे. या सामन्यात यूपी वॉरियर्सने (MI vs UP WPL) नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या सामन्यात भारतीय महिला क्रिकेटपटू किरण नवगिरेने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. अशातच तिच्या आक्रमक फलंदाजीने सर्वांची मने जिंकली आहेत.

Kiran Navgire WPL l किरण नवगिरेने केली तुफान फटकेबाजी :

29 वर्षीय किरण नवगिरे या महिला क्रिकेटरने मागील दोन सामन्यांत चांगली खेळी केली नव्हती. अशा स्थितीत ती दोन्ही सामन्यांमध्ये फ्लॉप ठरली. मात्र काल झालेल्या सामन्यात किरणने आपले नाव कोरले आहे. नवगिरेने मुंबई इंडियन्सच्या (MI vs UP WPL) गोलंदाजांचा चांगलाच पराभव केला आणि तुफान फटकेबाजीच्या जोरावर युपी वॉरियर्सचा या हंगामातील पहिला विजय मिळवला आहे.

किरणने कालच्या सामन्यात 31 चेंडूत 57 धावांची खेळी केली आहे. यामध्ये 6 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश आहे. किरणने या सामन्यात चौकार आणि षटकारांच्या मदतीने 10 चेंडूत 48 धाव घेतल्या आहेत. (MI vs UP WPL)

Kiran Navgire WPL l मुंबई इंडियन्सने यूपीला 162 धावांचे लक्ष्य दिले होते :

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या मुंबई इंडियन्सला हेली मॅथ्यूज आणि यास्तिका भाटिया या दोन्ही सलामीवीरांनी दमदार सुरुवात केली. या दोन्ही महिला क्रिकेटने पहिल्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी झाली. मात्र, यानंतर मिडल ऑर्डर फ्लॉप झाली. त्यामुळे मुंबई इंडियन्सने 20 षटकांत 6 बाद 161 धावा केल्या. हेलीने संघाकडून सर्वाधिक 55 धावा केल्या. तर यूपीकडून अंजली सरवानी, ग्रेस हॅरिस, सोफी एक्लेस्टोन, दीप्ती शर्मा आणि राजेश्वरी गायकवाड यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला आहे.

News Title : Kiran Navgire WPL News

महत्त्वाच्या बातम्या – 

गुड न्यूज! दीपिका पदुकोण आई होणार, ‘या’ महिन्यात होणार डिलिव्हरी

BCCI ने जाहीर केला वार्षिक करार! या चार खेळाडूंना मिळणार तब्बल 7 कोटी रुपये

आजचे राशिभविष्य! गुंतवणुकीशी संबंधित बाबींना गती मिळेल

महाशिवरात्रीचे व्रत या पद्धतीने साजरे करा; होईल मनोकामना पूर्ण

…या कारणामुळे मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन केले स्थगित