Ganpat Gaikwad Firing l महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी उल्हासनगरमध्ये भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आमदार आणि स्थानिक शिवसेना नेत्यावर झालेल्या गोळीबाराची घटना “गंभीर” असल्याचे म्हटले आहे. अशातच यासंदर्भात राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या घटनेसंदर्भात उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
अशातच आता आणखी एक महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता पोलिसांना ठाण्यातील सर्वच जणांच्या बंदुकीचे लायसन्सची पडताळणी करण्याचे आदेश शासनाने दिले आहे.
ठाण्यामध्ये किती जणांकडे बंदुकीचे परवाने :
ठाण्यात आतापर्यंत जवळपास 4 हजार जणांना बंदुकीचे लायसन्स देण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये अनेक राजकारणी, बिल्डर आणि तथाकथित समाजसेवकांचा समावेश आहे. बंदूक लायसन्समध्ये राजकारणी अग्रस्थानी आहेत. आता या प्रकरणानंतर ठाणे पोलीस सर्वच लायसन्सची पडताळणी करणार आहेत.
Ganpat Gaikwad Firing l …तर लायसन्स रद्द होणार :
राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर पोलीस पडताळणीत आता बंदुकीचे लायसन्स का हवे आहे? त्याचे कारणे जाणून घेतली जाणार आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचे म्हणजे आवश्यकता नसल्यांचे लायसन्स रद्द होण्याची शक्यता
Ganpat Gaikwad Firing l नेमकं प्रकरण काय?
कल्याणचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शुक्रवारी रात्री शिवसेनेचे कल्याण विभाग प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथील पोलीस ठाण्यात जमिनीच्या वादातून गोळीबार केल्याची घटना घडली आहे. महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनाक असल्याचे ठाण्यातील रुग्णालयाने सांगितले आहे.
काय म्हणाले उपमुख्यमंत्री? (Devendra Fadnavis) :
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकारांना म्हणाले, “ही घटना गंभीर असून, मी डीजीपी (पोलीस महासंचालक) यांना उच्चस्तरीय चौकशी करण्यास सांगितले आहे. कायद्यासमोर प्रत्येकजण समान आहे, मग त्यांचा राजकीय संबंध असला तरीही देखील चौकशी होणार असे फडणवीस म्हणाले आहेत. तसेच यासंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की आमदाराने कोणत्या परिस्थितीत गोळीबार केला हे तपासात सापडेल. आमदार दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
News Title : Ganpat Gaikwad Firing
महत्वाच्या बातम्या –
Amol Kolhe Viral Video l अमोल कोल्हेंचा राम मंदिराबाबतचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल; पाहा व्हिडीओ
Politics Breaking News l राजकारणात मोठी खळबळ उडण्याची शक्यता! आश्चर्यचकित करणारा सर्वे समोर
Today Horoscope l आजचे राशिभविष्य! या राशी प्रेमप्रकरणात यशस्वी होतील
Poonam Pandey Alive l अभिनेत्री पूनम पांडे जिवंत! यामुळे तिने केला हा स्टंट