Politics Breaking News l राजकारणात मोठी खळबळ उडण्याची शक्यता! आश्चर्यचकित करणारा सर्वे समोर

Politics Breaking News l बिहारमध्ये नुकत्याच झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर I.N.D.I.A आघाडीला मोठा धक्का बसला आहे. नितीश कुमार पुन्हा एनडीएमध्ये सामील झाले आहेत. आता याचा लोकसभा निवडणुकीवर किती परिणाम होईल याबाबत सी व्होटरने एक सर्वेक्षण केले आहे. ज्यामध्ये लोकांना बिहारच्या राजकारणावर प्रश्न विचारण्यात आले आहेत. तर या सर्वेक्षणाचे आकडे काय सांगत आहे ते जाणून घेऊयात…

ABP CVoter च्या सर्वेक्षणात नागरिकांना काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यामध्ये तेजस्वी यादव (tejashwi yadav) काँग्रेसशी हातमिळवणी करून भाजपशी टक्कर देऊ शकतील का असा प्रश्न विचारण्यात आला होता. यामध्ये एकूण 52 टक्के लोकांचा असा विश्वास होता की, बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीत आरजेडी आणि काँग्रेस भाजपशी टक्कर देऊ शकतील. तर 36 टक्के लोकांचा असा विश्वास आहे की तेजस्वी यादव बिहारमध्ये काँग्रेसशी हातमिळवणी करून भाजपशी स्पर्धा करू शकणार नाहीत. याशिवाय 12 टक्के लोकांनी ते सांगू शकत नसल्याचे म्हटले आहे.

Politics Breaking News l बिहारमध्ये काँग्रेस पक्षाशी हातमिळवणी करून तेजस्वी यादव भाजपशी टक्कर देऊ शकतील का? (tejashwi yadav)  :

होय- 52%
नाही- 36%
सांगू शकत नाही – 12%

बिहारमधील NDA आघाडीत किती पक्षांचा समावेश आहे? :

गेल्या महिन्यात 28 जानेवारीला मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महाआघाडीपासून वेगळे होऊन बिहारमध्ये भाजपसोबत सरकार स्थापन केले होते. जेडीयूच्या महाआघाडीपासून वेगळे होण्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे.

बिहारमध्ये NDA आघाडीमध्ये भाजप, मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा पक्ष जनता दल (युनायटेड), चिराग पासवान यांचा एलजेपी (रामविलास), जितन राम मांझी यांचा हम पक्ष आणि उपेंद्र कुशवाह यांचा आरएलजेपी यांचा समावेश आहे, जे एकत्र निवडणूक लढवणार आहेत.

Politics Breaking News l असे होते 2019 च्या निवडणुकीचे निकाल :

2019 च्या लोकसभा निवडणुकीत NDA आघाडीने 40 लोकसभा जागांपैकी 39 जागा जिंकल्या. तर किशनगंज लोकसभेची जागा काँग्रेसने जिंकली होती. आता बिहारमधील आगामी लोकसभा निवडणुकीत तेजस्वी यादव म्हणजेच आरजेडी पक्ष काँग्रेससोबत निवडणूक लढवण्याची पूर्ण तयारी करत आहे.

मात्र आतापर्यंत बिहारमध्ये दोन्ही पक्षांमध्ये जागावाटप झालेले नाही. आता काँग्रेसशी हातमिळवणी करून तेजस्वी बिहारमध्ये भाजपला टक्कर देऊ शकतील का हा प्रश्न उपस्थित होत आहे.

News Title : Politics Breaking News

महत्वाच्या बातम्या – 

Today Horoscope l आजचे राशिभविष्य! या राशी प्रेमप्रकरणात यशस्वी होतील

Bharat Ratna Award l लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न पुरस्कार जाहीर! मात्र भारतरत्न पुरस्कार कोणाला दिला जातो

Poonam Pandey Alive l अभिनेत्री पूनम पांडे जिवंत! यामुळे तिने केला हा स्टंट

Valentine Week 2024 l प्रेमींनो… व्हॅलेंटाईन वीक येतोय? त्याआधी जाणून घ्या 7 दिवसांचे महत्त्व

Government security to Manoj Jarange Patil l मनोज जरांगे पाटील यांना सरकारी सुरक्षा; सुरक्षेबाबतचे कारण आले समोर;