Hsc Student Hall Ticket l अवघ्या काही महिन्यांवर दहावी आणि बारावीच्या परीक्षा येऊन ठेपल्या आहेत. विद्यार्थ्यांनी देखील अभ्यासाची जोरदार तयारी सुरु केली आहे. अशातच आता विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीची परीक्षा फेब्रुवारी आणि मार्चमध्ये होणार आहे. आता बारावीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढवणारी बातमी समोर आली आहे.
22 जानेवारीपासून मिळणार हॉलतिकीट :
उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीच्या परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र राज्य मिळणार आहे. विद्यार्थ्यांना येत्या 22 जानेवारीपासून ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अशातच राज्य मंडळाच्या माहितीनुसार कनिष्ठ महाविद्यालयांनी कोणतेही शुल्क न घेता प्रवेशपत्राची प्रत विद्यार्थ्यांना लवकरत लवकर उपलब्ध करून द्यायची आहे. (Hsc Student Hall Ticket 2024)
राज्य मंडळाच्या सचिव डॉ. अनुराधा ओक यांनी दिली माहिती :
यासंदर्भात राज्य मंडळाच्या सचिव डॉ. अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही महत्वपूर्ण माहिती दिली आहे. राज्य मंडळाने बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध (Hsc Student Hall Ticket 2024) करण्यात आले आहे. त्यानुसार 21 फेब्रुवारी ते 23 मार्च या कालावधीत लेखी परीक्षा पार पडणार आहेत.
Hsc Student Hall Ticket l तसेच बारावीच्या विदयार्थ्यांची तोंडी प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा ही 2 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. यापार्श्वभूमीवर राज्य मंडळाकडून बारावी परीक्षा प्रवेशपत्र 22 जानेवारीपासून उपलब्ध करून दिले जाणार आहे.
मात्र यासंदर्भात कनिष्ठ महाविद्यालयांनी कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता प्रवेशपत्राची (Hsc Student Hall Ticket 2024) प्रत डाऊनलोड करून त्यावर प्राचार्यांचा शिक्का मारून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यायचे आहे.
News Title : Hsc Student Hall Ticket 2024
महत्त्वाच्या बातम्या-
Pradhan Mantri Mudra Yojana l महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मिळणार तब्बल 10 लाखांचं कर्ज!
ऐश्वर्या राय आणि जया बच्चन यांच्यातलं भांडण गेलं टोकाला; कोण म्हणालं, “काहींना लाज सुद्धा वाटत नाही”
Bollywood News | बॉलिवूडमध्ये एकच कुजबूज, ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री प्रेग्नंट असल्याची जोरदार चर्चा