Tata Punch.ev Launch l देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्स ग्राहकांसाठी नवनवीन आणि आकर्षक कार लाँच करत असते. अशातच या आघाडीच्या (Tata Punch.ev Launch) कंपनीने ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. टाटा मोटर्स कंपनी आता इलेक्ट्रिक वाहनांचा विस्तार करण्यासाठी सज्ज झाली आहे.
अशातच कंपनीने जबरदस्त फीचर्ससह एक इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे. कंपनीने या कारला Punch.ev असे नाव दिले आहे. ही कार एका चार्जवर 421 किलोमीटरची रेंज देत आहे. या कारची सुरुवातीची किंमत 10.99 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप व्हेरिएंटची किंमत 15 लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत आहे.
Tata Punch.ev Launch l या इलेक्ट्रिक कारला सनरूफ उपलब्ध असणार :
कंपनीने या सुसज्ज कारमध्ये इलेक्ट्रिक सनरूफचा पर्याय देखील दिला आहे. याशिवाय कारमध्ये Hey Tata, Google Voice Assistance, Alexa आणि Siri साठी सपोर्ट उपलब्ध असणार आहे.
366 लिटर बूट स्पेस :
कंपनीने नवीन इलेक्ट्रिक पंचमध्ये 366 लीटर बूट स्पेस दिली आहे. याशिवाय कारच्या समोर 14 लीटरची वेगळी जागा आहे, ज्यामध्ये तुम्ही खाद्यपदार्थांसह काहीही ठेवू शकता. (Tata Punch.ev Launch)
2 बॅटरी पॅक उपलब्ध :
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ही कार 2 बॅटरी पॅकसह आहे. कंपनी या कारमध्ये 25 kwh आणि 35 kwh बॅटरी पॅक देत आहे. ही कार 9.6 सेकंदात 0-100 किमीचा वेग पकडते.
रेंज किती असणार :
नवीन इलेक्ट्रिक पंच एका चार्जवर 421 किलोमीटरची रेंज देते. याशिवाय ही कार 25 kwh बॅटरीसह 315 किमीची रेंज देते. तसेच ही कार 2 बॅटरी पॅकसह येते.
चार्जिंग सिस्टम किती मोठी आहे?
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने इलेक्ट्रिक वाहनांवर जास्त लक्ष केंद्रित केले आहे. कंपनीने देशात एकूण 7000 हून अधिक इलेक्ट्रिक वाहन चार्जर (Tata Punch.ev Launch) बसवले आहेत.
Tata Punch.ev Launch l या कारमध्ये तुम्हाला काय वैशिष्ट्ये मिळतील :
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या कारमध्ये एलईडी हेडलाइट्स आणि एलईडी डीआरएल मिळतील. याशिवाय फ्रंक, ऑटो होल्ड, 360 डिग्री कॅमेरा, मल्टिपल व्हॉईस असिस्टंट, लेदरेट व्हेंटिलेटेड सीट्स, AQI डिस्प्लेसह एअर प्युरिफायर, SOS फंक्शन आणि DC फास्ट चार्जिंगसह EPB सुरक्षिततेच्या दृष्टीने उपलब्ध आहे.
News Title : Tata Punch.ev Launch
महत्त्वाच्या बातम्या-
Pradhan Mantri Mudra Yojana l महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मिळणार तब्बल 10 लाखांचं कर्ज!
ऐश्वर्या राय आणि जया बच्चन यांच्यातलं भांडण गेलं टोकाला; कोण म्हणालं, “काहींना लाज सुद्धा वाटत नाही”
Bollywood News | बॉलिवूडमध्ये एकच कुजबूज, ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री प्रेग्नंट असल्याची जोरदार चर्चा
“सहा जिल्ह्यांचा पालकमंत्री? म्हणजे काय तो स्पायडरमॅन आहे का”?