Imran Tahir Catch l क्रिकेटमध्ये खेळाडू वयाच्या 44 व्या वर्षी निवृत्त होतात. पण असे काही खेळाडू आहेत ते वयाला न जुमानता खेळतच राहतात. असाच एक खेळाडू आहे जो त्याच्या फिटनेसमुळे जबरदस्त व्हायरल होत आहे. इम्रान ताहिर असे या खेळाडूचे नाव आहे. (Imran Tahir)
Imran Tahir Catch l ताहिर दोन अप्रतिम कॅच घेण्यात यशस्वी :
ताहिर हा धोनीचा जुना मित्र आहे कारण तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला आहे. 7 फेब्रुवारीला म्हणजेच काल दक्षिण आफ्रिकेच्या T20 लीगमध्ये झालेल्या सामन्यात ताहिरने एक नव्हे तर दोन असे झेल घेतले, जे पाहिल्यानंतर तुम्हीही थक्क व्हाल.
आपण ताहिरने घेतलेल्या ज्या कॅचबद्दल बोलत आहोत ते साधे कॅच नव्हते. फिटनेसशिवाय ते कॅच पकडणे शक्य नाही. आणि ताहिर ज्या पद्धतीने एकाच सामन्यात एक नव्हे तर दोन अप्रतिम कॅच घेण्यात यशस्वी झाला आहे. क्रिकेटमध्ये जेव्हा खेळाडूंच्या फिटनेसची चर्चा होते तेव्हा विराट कोहलीचे उदाहरण दिले जाते. पण, इम्रान ताहिरचे हे दोन कॅच आहेत जे एखाद्या खेळाडूच्या जबरदस्त फिटनेसचे उदाहरण आहेत.
𝑨𝒈𝒆 𝒊𝒔 𝒏𝒐𝒕𝒉𝒊𝒏𝒈 𝒃𝒖𝒕 𝒂 𝒏𝒖𝒎𝒃𝒆𝒓 🤯#Betway #SA20 #WelcomeToIncredible #PRvJSK #Eliminator pic.twitter.com/LVzjlBO4kf
— Betway SA20 (@SA20_League) February 7, 2024
Imran Tahir Catch l वयाच्या 44 व्या वर्षी इम्रान ताहिरचे हे 2 झेल पाहा! :
काल झालेल्या SA20 मध्ये पार्ल रॉयल्स आणि जॉबर्ग सुपर किंग्ज यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात जोबर्ग सुपर किंग्जकडून खेळणाऱ्या 44 वर्षीय इम्रान ताहिरने (Imran Tahir) आपली प्रतिभा दाखवली आहे. यामध्ये इम्रान ताहिरने शानदार कॅच घेतला आहे.
इम्रान ताहिरने (Imran Tahir) सामन्यातील केवळ या दोन आश्चर्यकारक झेलांवर अवलंबून राहिला नाही तर यानंतर त्याने 2 विकेट्स देखील घेतल्या आहेत. त्यापैकी एक पार्ल रॉयल्सचा कर्णधार डेव्हिड मिलरचा होता. त्याने सामन्यात 4 षटकात 33 धावा देत दोन्ही विकेट घेतल्या आहेत.
News Title : Tahir managed to take two amazing catches
महत्वाच्या बातम्या –
शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या! या भागात पडणार अवकाळी पाऊस
मोठी बातमी! पुण्यातील गुंडगिरी संपणार, पोलीस आयुक्तांनी घेतला सर्वात मोठा निर्णय
पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते उघडण्याचे हे आहेत सोपे मार्ग; बँकांपेक्षा मिळेल जास्त व्याजदर
Today Horoscope l आजचे राशिभविष्य! नशीब चमकणार; या 3 राशींच्या धनात होणार वाढ
Jasprit Bumrah News l बुम बुम बुमराहने रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला गोलंदाज